Viral Video: बिबट्याचा पार्कात धुमाकूळ, पाचजण हल्ल्यात जखमी

Viral Video: बिबट्याचा पार्कात धुमाकूळ, पाचजण हल्ल्यात जखमी

Viral Video: बिबट्याचा पार्कात धुमाकूळ, पाचजण हल्ल्यात जखमी

जम्मूच्या गांधीनगरच्या ग्रीन बेल्ट पार्कच्या भागात घुसलेल्या बिबट्याला अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. बिबट्याला ट्रॅकुलाइजर गनने बेशुद्ध केले गेले आणि नंतर जाळे टाकून त्याला पकडले. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तीन लोकं जखमी झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक जागरण या वृत्तसंस्थेने दिले आहे.

माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस जंगलात भरकटलेल्या बिबट्या जम्मूच्या पॉश भागात पोहोचला. सकाळी पार्कमध्ये बिबट्याला पाहिल्यानंतर लोकांमध्ये एकच दहशत पसरली. या पार्कमध्ये स्वछंदपणे बिबट्या फिरत होता. काही लोकांचा मागे देखील लागला. सर्वात पहिल्यांदा बिबट्याला माळीने पाहिले. यादरम्यानच बिबट्या पॉवर हाऊस क्षेत्रात घुसला आणि तिथे एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. यामध्ये वृद्ध व्यक्तीने गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वृद्ध व्यक्ती एका जोकी मार्बल प्लेटवर नाव लिहिण्याचे काम करतो. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला जास्त दुखापत झाली आहे.

घटनास्थळावर पोहोचलेल्या वन्यजीव संरक्षण विभागाचे पथक बिबट्याला पकडण्यात तयार झाले. ट्रँकुलाइजर गनच्या माध्यमातून बिबट्याला बेशुद्ध केले. यादरम्यान वन्यजीव कर्मचारीचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. बिबट्या बेशुद्ध होण्यासाठी ४० मिनिटे वाट पाहावी लागली. त्यानंतर त्याच्यावर जाळे टाकून बिबट्याला पकडण्यात आले.


हेही वाचा – सलून मधे गान ऐकताना आली गर्लफ्रेंडची आठवण. रडून झाला बेहाल…व्हिडिओ व्हायरल


 

 

First Published on: April 6, 2021 6:57 PM
Exit mobile version