बिस्लेरी कंपनीचा कारभार महिलेच्या हाती; जयंती चौहान बनल्या नव्या सीईओ

बिस्लेरी कंपनीचा कारभार महिलेच्या हाती; जयंती चौहान बनल्या नव्या सीईओ

मिनरल वॉटर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून बिस्लेरी या कंपनीची ओळख आहे. याच बिस्लेरी कंपनीला कंपनीचा कारभार आता एका महिलेच्या हाती देण्यात आला आहे. जयंती चौहान यांची बिस्लेरी कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांनी केली आहे. जयंती चौहान या रमेश चौहान यांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून बिस्लेरी ही कंपनी टाटा समूहाकडून खरेदी करणार अशी चर्चा सुरु होती. याबद्दल तसा करार देखील करण्यात आला होता. परंतु, हा करार आता रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

बिस्लेरीचे इंटरनॅशनल चेअरमन रमेश चौहान यांनी जयंती चौहान यांच्या नावाची घोषणा करण्यासोबतच आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. यानंतर आता आमची कंपनी आम्ही विकणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सोबत करार रद्द झाल्यानंतर कंपनीने संपूर्ण कारभार हा जयंती चौहानच्या हाती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्यामुळे आता जयंती या बिस्लेरी इंटरनॅशनल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँजेलो जॉर्ज यांच्यासोबत कंपनी सांभाळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरीचे चेअरमन आणि उद्योजक रमेश चौहान यांचे हे 82 वर्षांचे आहेत. मागील काही दिवसांपासून वयामुळे त्यांची प्रकृती बिघडलेली असते. तसेच, बिस्लेरी कंपनीला भविष्यात पुढे नेण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी उत्तराधिकारीदेखील नव्हता. तर त्यांची मुलगी जयंती चौहान ही सुद्धा बिस्लेरी कंपनीच्या व्यवसायाबाबत फारशा उत्सुक नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे रमेश चौहान यांच्याकडून बिस्लेरी कंपनी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रमेश चौहान यांनी एका मुलाखतीत टाटासह इतर काही कंपन्या बिस्लेरी खरेदी करण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले होते.

कोण आहेत जयंती चौहान?
४२ वर्षीय जयंती चौहान या बिस्लेरी कंपनीचे प्रमुख रमेश चौहान यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात गेले आहे. जयंती यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर लॉस एंजेलिसमधील FIDM (फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंग) प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे शिक्षण घेतले आहे. तर लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे सुद्धा जयंती यांनी शिक्षण घेतलेले आहे. जयंती यांनी अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही काम केलेले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मधून त्यांनी अरबी भाषेचेही शिक्षण घेतले आहे.


हेही वाचा – पाटणा जंक्शनमधील स्क्रीनवर सुरू झाली अश्लिल फिल्म, रेल्वे अधिकाऱ्याकडून मोठी कारवाई

First Published on: March 20, 2023 4:16 PM
Exit mobile version