5G साठी जिओने ठरवली ‘ही’ चार शहरं, दिवाळीपासून मिळणार सुविधा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचं उद्घाटन झालं आहे. आता, रिलायन्स जीओने भारतात 5G सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चैन्नई या चार शहरांत जीओकडून दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा पंतप्रधान मोदींना उद्योगपती अंबानी पिता-पुत्राकडून 5G सेवेचे प्रात्याक्षिक

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जीओने एन्ट्री केली तेव्हा त्यांच्याकडे अल्प ग्राहकवर्ग होता. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांनी मोफत सीमकार्डसह मोफत इंटरनेट सुविधा पुरवल्यानंतर अनेकजण रिलायन्स जीओकडे वळले. यामुळे एअरटेलसह व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या देशोधडीला लागल्या. मात्र, त्यानंतर, जीओने मोफत सेवा बंद करून अल्प किंमतीची सुविधा सुरू केली. तरीही जीओचे ग्राहक कमी झाले नाही. अनेक ठिकाणी जीओचे टॉवर्स असल्याने शहरांसह अनेक ग्रामीण भागातही जीओचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. त्यामुळे जीओ विरुद्ध इतर टेलिकॉम कंपन्या यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.

देशात फाईव्ह जीचे उद्घाटन झाल्यानंतर एअरटेलने आठ शहरांमध्ये 5G सेवेला प्रारंभ केला. त्यामुळे जीओनेही तत्काळ चार शहरांमध्ये चार शहरं निवडली आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या शहरांचा त्यात समावेश असून थोड्याच दिवसांत पुण्यातही ही सेवा विस्तारण्यात येणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व तालुका, जिल्हा पातळीवर जीओ 5G सेवा पसरेल असं सांगण्यात येतंय.

हेही वाचाएअरटेलची 5G सेवा याच महिन्यात होणार सुरू; ‘या’ शहारातून मिळणार पहिली सुविधा

4G प्लान्सच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना 5G सेवेचे प्लान्स किती रुपयाला मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, याबाबत अद्यापही काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. 4Gपेक्षा थोड्या जास्त किंमतीचे आणि जास्त डेटा असेलेल प्लान्स 5Gसाठी असतील असं सांगण्यात येतंय.

First Published on: October 4, 2022 6:58 PM
Exit mobile version