धक्कादायक! फक्त १५ हजार रुपयांसाठी जस्ट डायलने ग्राहकांचा डाटा विकला

धक्कादायक! फक्त १५ हजार रुपयांसाठी जस्ट डायलने ग्राहकांचा डाटा विकला

भारतीय लोकल सर्च इंजिन (Indian Local Search Engine) म्हणून ओळख असलेल्या जस्ट डायल (Just Dial) या कंपनीने अवघ्या काही रुपयांसाठी त्यांच्या ग्राहकांचा डेटा बनावट कॉल सेंटर कंपन्यांना (Data leek to bogus companies) विकला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हरियाणामधील गुरुग्रामच्या सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या १५ हजार रुपयांसाठी हा डाटा लीक केल्याची माहिती समोर आली आहे. (Just dial leek customers data to bogus call centers for 15 thousands only)

हेही वाचा – मुकेश अंबांनी दोन वर्षे पगाराविनाच, का ते वाचा!

कोणत्याही संस्थेचा क्रमांक, पत्ता, तिकिट बुकींग किंवा सर्व ग्राहक सुविधांसाठी जस्ट डायल ही कंपनी काम करते. या कंपनीची सुविधा घेताना ग्राहकांना त्यांची माहिती द्यावी लागते. कोणत्याही इंटरनेट कंपनीकडून ग्राहक सुविधा घेत असेल तर ग्राहकांचा संपर्क क्रमांकासहित अनेक माहिती संबंधित कंपनीला दिली जाते. मात्र ही माहिती गुप्त ठेवण्यात येईल असं कंपनीकडून सांगण्यात येतं. परंतु, काही कंपन्यांकडून ग्राहकांचा डाटा बनावट कॉल सेंटरना विकला जातो. या बनावट कंपन्या डेटा घेऊन ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे अशा पद्धतीने बनावट कंपन्यांना डेटा पुरवणाऱ्या कंपनीविरोधात पोलीस काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – ईपीएफओच्या २८ कोटी खातेधारकांची माहिती लीक, तुमचंही यादीत नाव नाही ना?

फक्त १५ हजार रुपयांत शेकडो लोकांची माहिती लीक

सायबर गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जस्ट डायलसारख्या काही कंपन्या १५ हजार रुपयांच्या बदल्यात शेकडो लोकांची माहिती आणि संपर्क क्रमांक बनावट कंपन्यांना विकते. त्यानंतर या बनावट कंपन्या संबंधित लोकांना फोन करून पॉलिसी नुतनीकरणाच्या नावाखाली गंडा घालतात.

‘ही’ सर्व माहिती चोरली जाते

फक्त आपले नाव आणि मोबाईल नंबरच नव्हे तर सर्वच माहिती अशा ठगांना विकली जाते. यामध्ये ग्राहकांचे ईमेल, नाव, पत्ता, शिक्षण, राहणीमान सर्व माहिती बनावट कंपन्यांना दिली जाते.

हेही वाचा – आरबीआयचा निर्णय : कर्ज महागले; रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ

असा लागला शोध

पॉलिसी नुतनीकरण फसवणुकीच्या प्रकरणात दिल्लीच्या शाहदरा येथील एका बनावट कॉल सेंटरची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या कॉल सेंटरच्या मालकाने डेटा लिकची माहिती दिली. अवघ्या काही रुपयांच्या बदल्यात कॉल सेंटरला ग्राहकांची माहिती विकली जाते, आणि ती माहिती मिळवून संबंधित लोकांची आर्थिक फसवणूक केली जाते.

First Published on: August 8, 2022 8:31 PM
Exit mobile version