४० लाखांच्या लाच प्रकरणी सत्तााधारी भाजप आमदाराला अटक, घरात ६ कोटींचं घबाड

४० लाखांच्या लाच प्रकरणी सत्तााधारी भाजप आमदाराला अटक, घरात ६ कोटींचं घबाड

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्याचं काम सुरूये. एकीकडे कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर दुसरीकडे भाजपने स्पष्ट बहुमतासाठी ‘5 बी’ प्लॅन तयार केला आहे. अशात भाजपला मोठा झटका मिळालाय. भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ४० लाखांचे लाच प्रकरण आता या भाजप आमदाराला चांगलंच भोवलंय.

काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपा आमदारपुत्राला तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे थेट आमदारांच्या कार्यालयातूनच ही लाच स्वीकारण्याचं काम सुरू होतं. कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजपा आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केली होती. यावेळी विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयात पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा आणखी एक धक्कादायक चित्र उघडकीस आलं. भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ६ कोटींचं घबाड सापडलं होतं. यावेळी त्यांच्या कार्यालयातून १ लाख २० कोटी रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

हे ही वाचा : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; मोबाईलही बंद

हे ही वाचा : कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ताचा मृत्यू, ५ वर्षांच्या साशाला नामिबियातून आणलं होतं…

या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून भाजप आमदार विरूपक्षप्पा यांचेही नाव होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या गावी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतने ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. प्रशांतचे वडील कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे आमदार आणि KSDL चे अध्यक्ष आहेत. प्रशांत २००८ च्या बॅचचा कर्नाटक प्रशासकीय सेवेचा अधिकारी आहे. भाजपा आमदार विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप अँड डिटर्जेंट लिमिटेडचे संचालक असून घेतली जाणारी लाच त्यांच्याच नावाने घेतली जात होती. साबण आणि इतर डिटर्जंट्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी कंत्राटदाराकडून त्याने ही लाच मागितली होती.

First Published on: March 27, 2023 9:13 PM
Exit mobile version