‘मारेकऱ्यांना दया दाखवू नका, मारुन टाका!’

‘मारेकऱ्यांना दया दाखवू नका, मारुन टाका!’

मारेकऱ्यांना दया दाखवू नका, मारुन टाका! - कुमारस्वामी

सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी त्यांच्या एका वक्तव्यामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये कुमारस्वामी फोनवर संभाषण करताना दिसत आहेत. ते फोनमध्ये संभाषण करताना समोरच्या व्यक्तीला सांगत आहेत की, ‘मारेकऱ्यांना दया दाखवू नका, मारुन टाका’. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही लोक त्यांच्या बोलण्याचे समर्थन करीत आहेत, तर काही लोक यावर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कुमारस्वामी असं काही बोलतील असं स्वप्नातही आपल्याला वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया काही लोकांकडून येत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना बघून हे प्रकरण जास्त ताणले जाऊ नये म्हणून कुमारस्वामींनी याप्रकरणी सावरासावर करण्यास सुरुवात केली. आपण अशाप्रकारचा कुठलाही आदेश दिला नसून भावनांच्या ओघात असं काही म्हणून गेलो, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – कुमारस्वामींसाठी १०० झाडांची कत्तल

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी जेडीएसचे मंत्री प्रकाश यांची हत्या करण्यात आली. प्रकाश हे कारने मद्दूरला जात होते. दरम्यान चा्र हल्लेखोरांनी दूचाकीच्या साहाय्याने त्यांना अडवले. त्या हल्लेखोरांनी जबरदस्ती कारचा दरवाजा उघडला आणि प्रकाश यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना मंड्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना कुमारस्वामींना कळताच संतप्त झालेले कुमारस्वामी फोनवर बोलताना म्हणाले की ‘प्रकाश हा चांगला आणि भला माणूस होता. ज्यांनी कोणी प्रकाशला मारले आहे त्या नराधमांना सोडू नका. त्यांच्यावर दया दाखवू नका, त्यांना मारुन टाका! काही हरकत नाही’. कुमारस्वीमींचे हे बोलणे एका कॅमेरामध्ये कैद झाले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक पत्र जाहिर करण्यात आले आहे. त्या पत्रामध्ये हत्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – कुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

First Published on: December 25, 2018 10:03 AM
Exit mobile version