महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने घुबडाचा बळी दिला

महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने घुबडाचा बळी दिला

निवडणूक जिंकण्यासाठी घुबडाचा वापर; तेलंगणाच्या राजकारण्यांची नवी शक्कल

अंधश्रध्देच्या आहारी गेलेली व्यक्ती काय काय करु शकते याचा प्रत्यय दिल्लीमध्ये आला आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने स्त्रीयांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी चक्क घुबडाचा बळी दिला आहे. मात्र ज्या दिवशी त्याने घुबडाचा बळी दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या वडीलांचे निधन झाले. तरी देखील त्याने जादूटोणा करणे काही थांबले नाही. मध्यरात्री तो त्या मृत घुबडावर काळीजादूचे प्रयोग करत होता. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अॅनिमल वेलफेयर बोर्डाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून कूलरमधून मृत घुबड जप्त केले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

कुलरमध्ये लपवले मृत घुबडाला

कन्हैया लाल असे या आरोपीचे नाव असून त्याने पोलिसांना सांगितले की, घुबडाचा बळी दिल्यानंतर त्याचे पाय तोडण्यात आले. तो एका महिलेवर प्रेम करत होते. या महिलेला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी तो जादूटोणा करत होता. त्याने १५ दिवसापूर्वी त्याच्या मेहूण्याकडून घुबडाला आणले होते. कन्हैय्या राहत असलेल्या परिसरामध्ये जादूटोणा करत असल्यामे आसपास राहणारी लोकं त्याला घाबरायचे. मात्र कोणी त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. आसपास राहणाऱ्या महिला त्याच्याकडे समस्याचे समाधाव करण्यासाठी देखील यायच्या.

धनसंपत्तीसाठी घुबडाचा बळी

४० वर्षाचा कन्हैया लाल सुल्तानपुरीच्या सी ब्लॉकमध्ये राहतो. कन्हैया गाडीचालक असून तो पत्नी आणि तीन मुलांसोबत याठिकाणी राहतो. कन्नू नावाच्या त्याच्या मेहूण्याने त्याला दिवाळीच्या रात्री घुबड आणून दिले होते. कन्नूनेच त्याला घुबडापासून जादूटोना केला तर महिला आकर्षित होतात आणि धनसंपत्ती मिळत असल्याचे सांगितले होते. कन्नूने कन्हैयाला सांगितले होते की, ज्या महिलेवर तो प्रेम करतो त्या महिलेचे केस आणि घुबडाचे पंख एकत्रित करुन रोज पुजा केली तर तुझी इच्छा पूर्ण होईल.

३ वर्षाची शिक्षा केली जाते

जादूटोणा करण्यासाठी घुबडांना जवळपास वर्षभरापूर्वीच पकडले जाते. दिवाळीच्या काळात घुबडाची डिमांड वाढते. एक घुबड या काळात ३५ हजार रुपयांना विकले जाते. अॅनिमल राइट्ससाठी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अॅक्टनुसार घुबडांना स्वरक्षित पक्षांच्या लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याना पकडे, कैद करुन ठेवणे, खरेदी-विक्री करणे तसंच त्यांना कोणत्याही प्रकराचे नुकासन पोहचवले तर ३ वर्षाची शिक्षा सुनावली जाते. त्याचसोबत अनेकदा घुबडांची तस्करी देखील केली जाते. घुबडांचे नखं आणि केसांसाठी त्यांची शिकार केली जाते.

First Published on: November 14, 2018 10:27 PM
Exit mobile version