Lakhimpur Kheri Violence: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना अटक

Lakhimpur Kheri Violence: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना अटक

लखीमपूर खीरीला जाण्याच्या प्रयत्नात लखनऊहून निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना सोमवारी सीतापूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज, मंगळवारी प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रियांका गांधी यांच्यासोबत ११ लोकांवर शांतता भंग करण्याचा आरोप लावला असून यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता त्यांना वैयक्तिक बाँडवर सोडता येईल. सध्या त्यांच्या सुटकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे प्रियांका गांधी यांच्या अटकेची माहिती मिळताच काँग्रेस प्रचंड संतापली आहे.

सीतापुरमध्ये पीएसी सेकेंड बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ताब्यात घेतलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि ११ जणांविरोधात आज हरगाव पोलिसांना कलम १०७/११६ आणि १५१ अंतर्गत कारवाई केली आहे. या कलमां अंतर्गत बंदी घालण्यासाठी हरगाव पोलिसांनी एसडीएमला अहवाल पाठवला आहे. एसडीएमच्या शिफारशीनंतर प्रियांका गांधी आणि त्यांच्या समर्थकांवर बंदी घालण्याची प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर त्यांना वैयक्तिक बाँडवर सोडण्यात येईल.

एसडीएमच्या पीएल मौर्य यांनी सांगितले की, ‘प्रियांका गांधी वाड्रा यांना अटक करून पीएसीच्या गेस्ट हाऊसवर पाठवले होते. सुटकेसाठी अजूनपर्यंत काही निश्चित झाले नाही आहे. तसेच प्रियांका गांधी यांना सुटकेसाठी न्यायालयात हजर करणे गरजेचे नाही आहे. सीआरपीसीमध्ये असे अनेक कलम आहेत, ज्यात दंडाधिकारी तात्पुरते कुठेही आवश्यकतेनुसार सुनावणी करू शकतात. आदेश मिळताच त्यांना वैयक्तिक बाँडवर सोडण्यात येईल.’ याप्रकरणात प्रियांका गांधी यांच्या सुटेबाबत संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती आहे.


हेही वाचा – Lakhimpur violence: …आणि प्रियांका गांधीवर आली गेस्ट हाऊस झाडण्याची वेळ


 

First Published on: October 5, 2021 9:46 PM
Exit mobile version