Lakhimpur violence: …आणि प्रियांका गांधीवर आली गेस्ट हाऊस झाडण्याची वेळ

४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खोली रिकामी असून प्रियंका गांधी तिथे झाडू मारताना दिसत आहेत.

Lakhimpur violence Priyanka Gandhi sweeping guest house video viral viral
...आणि प्रियांका गांधीवर आली गेस्ट हाऊस झाडण्याची वेळ

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर (Lakhimpur violence) येथील मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना सीतापूर येथे २२व्या बटालियान गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना ज्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे तिथला प्रियंका गांधींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या गेस्ट हाऊसची खोली झाडूने साफ करताना दिसत आहेत. ४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खोली रिकामी असून प्रियंका गांधी तिथे झाडू मारताना दिसत आहेत.

प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेताना त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांना प्रियंका गांधी कायद्याचे धडे देताना देखील दिसल्या.

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आजतकशी सांधलेल्या संवादात असे म्हटले आहे की, प्रियंकाने मला रात्रीच म्हटले होते की मी लखीमपुर येथे पोहचेन. तिथे शेतकऱ्यांचे कोणीही ऐकून घेत नाही. त्यांच्यावर गाडी चालवली जाते. रात्री खुप पाऊस होता म्हणून त्यांनी रस्त्याने प्रवास केला. मात्र त्यांना रस्त्यातच रोखण्यात आले. प्रियंका यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे कोणताही वॉरंट किंवा डॉक्यूमेंट नव्हते. मला माहिती आहे प्रियंका शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटल्याशिवाय परत येणार नाही.

वाड्रा यांनी पुढे असे म्हटले की, तुमचे सरकार आहे म्हणजे तुम्ही काहीही कराल असे नाही. ज्यांनी शेतकऱ्यांवर गाडी चाललवी त्यांच्यावर केस नाही केली. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पीडितांना शेतकऱ्यांची मदत मिळायला हवी आणि दोषींच्या विरोधात कारवाई करायला हवी.


हेही वाचा – Gautam Adani : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक पण ट्रेण्डमध्ये गौतम अदानी, काय आहे कनेक्शन?