Live Update: संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही – राजू शेट्टी

Live Update: संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही – राजू शेट्टी
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. वाचा सिवस्तर
रतनलाल सी बाफना ज्वेलर्स चे संचालक आणि शाकाहारी चळवळी चे प्रणेते रतनलाल बाफना यांचं वृद्धाप काळाने निधन मृत्यू समयी ते ८६ वर्षांचे होते,गेल्या काही दिवस पासून ते आजारी होते.
लातूर जिल्ह्यातील आशिव या गावांमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या वडीलांनी पत्नी बरोबर झालेल्या भांडणाच्या रागात मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला आहे. घटनेची माहिती कळताच भादा पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
सातव्यांदा नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
थोड्याच वेळात नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा उपस्थित आहेत.
हिमाचल प्रदेश मधली कुफरी येथे आज दुपारी बर्फवृष्टी झाली
पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आले आहे. नागपूरच्या शहीद जवान भूषण सतई आणि कोल्हापूरच्या ऋषिकेश जोंधळे यांना आज अखेरचा निरोप दिला आहे.
गेल्या २४ तासांत देशात ३० हजार ५४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८८ लाख ४५ हजार १२७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३० हजार ७० रुग्णांचा मृत्यू झाला असून ८२ लाख ४९ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ६५ हजार ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
जगात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढ आहे. वर्ल्डोमीटरच्या आकड्यानुसार, जगातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडा ५ कोटी ४८ लाखांवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख २४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ कोटी ८१ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी दिवसभरात राज्यात २,५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,४७,२४२ झाली आहे. राज्यात ८४,९१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,९७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा
First Published on: November 16, 2020 6:53 PM
Exit mobile version