Lok Sabha 2024 : हिमाचलमधील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबर कंगनाने धुळवड केली साजरी

Lok Sabha 2024 : हिमाचलमधील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबर कंगनाने धुळवड केली साजरी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौतला तिकीट दिले आहे. त्यामुळे होळी सणाचा आनंद तिचा द्विगुणीत झाला आहे. तिने आज, सोमवारी पक्षाच्या जिल्हा शाखेतील पदाधिकाऱ्यांसह धुळवड साजरी केली. लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल कंगनाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खासदार अनुराग ठाकूर यांचे आभार मानले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : विजय देदीप्यमान झाला असता, पण याचा अर्थ…, वंचितबाबत संजय राऊतांची टिप्पणी

हिमाचल प्रदेशमधील नागरिकांसाठी तिने खास संदेश दिला आहे. मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देते. ही माझी जन्मभूमी आहे आणि तिने मला परत बोलावले आहे, म्हणूनच मी भाग्यवान आहे. तुम्ही मला निवडून दिले तर मी तुमची सेवा करेन. सध्या मी भारावून गेलो आहे आणि माझ्या कुटुंबासाठी हा एक भावनिक दिवस आहे. जेपी नड्डा आणि अनुराग ठाकूर यांचे मी मनापासून आभार मानते, असे तिने म्हटले आहे.

एकमेकांना सहकार्य करणे, ही भाजपची संस्कृती असल्याचे कंगना रणौतने सांगितले. माझा त्यावर विश्वास आहे आणि मी त्यांच्यासोबत राहणार आहे. आम्ही मोठा विजय मिळविणार आहोत, असेही तिने म्हटले आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी भेटून होळी साजरी करताना दिसत आहे. त्या कार्यकर्त्यांच्या कपाळावर टिळक लावत आहेत. काही वेळाने ती इतर नेत्यांसोबत ‘जय श्री राम’चा नारा देताना दिसत आहे. अभिनयाकडून राजकारणात आलेल्या कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नोव्हेंबर 2023मध्ये गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरात पूजाअर्चा कंगनाने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. भाजपाकडून रविवारी उमेदवारी घोषित झाल्यानंतर, कंगना रणौत म्हणाली की, ती अधिकृतपणे राजकीय पक्षात सामील होण्यास आणि विश्वासू लोकसेवक बनण्यास उत्सुक आहे. माझा प्रिय भारत आणि भारतीय जनतेची आपली स्वतःची पार्टी भारतीय जनता पक्षाचे मी कायम समर्थन केले आहे, आज माझी जन्मभूमी हिमाचल प्रदेश, मंडी (मतदारसंघ) येथून भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत हायकमांडने घेतलेल्या या निर्णयाचा मी स्वीकार करते, असे तिने काल, रविवारी म्हटले होते.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

First Published on: March 25, 2024 4:30 PM
Exit mobile version