घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : विजय देदीप्यमान झाला असता, पण याचा अर्थ..., वंचितबाबत...

Lok Sabha 2024 : विजय देदीप्यमान झाला असता, पण याचा अर्थ…, वंचितबाबत संजय राऊतांची टिप्पणी

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार होती. परंतु जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी नाराज आहे. त्यामुळे मविआपासून वंचित आघाडीने लांब राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : अरविंद केजरीवाल आता मोदींसाठी अधिक धोकादायक बनलेत, संजय राऊतांचा दावा

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष Adv. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आली असल्याची घोषणा केली आहे. परंतु, त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली नाही. त्यामुळे याबाबत खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.

संजय राऊत यांना आज, सोमवारी याबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही दिलेला चार जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने स्वीकारायला हवा होता. पण शेवटी त्या स्वीकारायच्या की नाही हा त्यांचा निर्णय आहे. महाविकास आघाडीत चार ते पाच पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे त्यांनाही त्यांचा वाटा मिळायला हवा.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते आहेत. ते आमच्यासोबत असावेत, अशी आमची नेहमीच इच्छा असते. त्यांना बरोबर घेण्याचे प्रयत्न कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. पण मविआसोबत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आमच्या मागे जनमत असल्याने विजय मिळवूच. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते, तर हा विजय आणखी देदीप्यमान झाला असता. मताधिक्य वाढले असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आम्ही परावलंबी आहोत, असे संजय राऊत यांनी सुनावले.

ठाकरे गटाची यादी मंगळवारी होणार जाहीर

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण अद्याप ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपापल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पण आता ठाकरे गटाकडून उद्या, मंगळवारी 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -