LPG Gas: देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही अँड्रेस प्रूफशिवाय मिळणार LPG सिलेंडर, कसे मिळवाल कनेक्शन जाणून घ्या

LPG Gas: देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही अँड्रेस प्रूफशिवाय मिळणार LPG सिलेंडर, कसे मिळवाल कनेक्शन जाणून घ्या

LPG Cylinder Price: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर ५५ रुपयांनी महागला

कोरोनामुळे बरेच जण एका शहारातून दुसऱ्या शहरात स्थलांतर होत आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे गॅस कनेक्शन मिळवणे खूप कठीण होते. गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी अँड्रेस प्रूफ असणे गरजेचे असेत. ते नसल्याने गॅस कनेक्शन मिळणे कठीण होऊन बसते. मात्र आता जास्त काळजी करण्याची गरज नाही. दुसऱ्या शहरात स्थलांतर झाल्यास केवळ एका आयडी प्रूफवर गॅसचे कनेक्शन मिळवता येणार आहे.  कोरोनाच्या काळात लोकांचे स्थालांतरण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता LPG गॅसचे कनेक्शन घेणे सोपे होणार आहे. LPG च्या ग्रााहकांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही.

याआधी गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुमचा कायमस्वरुपी असलेल्या पत्यांची गरज होती. ज्यांच्याकडे कायमस्वरुपी पत्याचा पुरावा आहे अशा लोकांनाच LPG गॅस विकत घेता येऊ शकत होता. मात्र देशातील सरकारही तेल कंपनी इंडियन ऑईल कंपनीनने सर्वसामान्य जनतेचा विचार करुन LPG गॅसवरील कायमस्वरुपी पत्ता गरजेचे असलेले बंधन काढून टाकले आहे. त्यामुळे केवळ कोणत्याही एका ओळखपत्राशिवाय घरात LPG गॅसचे कनेक्शन मिळवता येणार आहे.

गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या एजन्सीमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. कायमस्वरुपी पत्याशिवाय कोणताही ओळखपत्राचा पुरावा दाखवून गॅस कनेक्शन मिळवता येणार आहे. सरकार पुढील दोन वर्षात १ कोटीहून LPG कनेक्शन देणार आहे.


हेही वाचा – ट्र्म्प यांचे अँटीबॉडी कॉकटेल भारतात, यात विशेष काय आहे?

 

 

First Published on: May 12, 2021 10:13 PM
Exit mobile version