तडे गलेल्या रुळाला धाग्याची मलमपट्टी! वाचवले हजारोंचे प्राण

तडे गलेल्या रुळाला धाग्याची मलमपट्टी! वाचवले हजारोंचे प्राण

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. ‘आवश्यकता ही अविष्कार की जननी है।’  ‘सुपर ३०’ या चित्रपटाचा हा डायलॉग एका तरुण रेल्वे अभियंत्याने सिद्ध करून दाखवला आहे. या अभियांत्रिकी अधिका-याने ट्रॅकला जोडलेल्या फिश प्लेटच्या ग्लूड जॉईन्ट फेल झाल्यानंतर त्याला दुरूस्त करण्यासाठी वर्षांनुवर्ष वापरत आलेली जुने तंत्र बदलले आहे. या अधिका्याने ट्रॅकच्या ग्लूड जॉईन्ट फेल झाल्यानंतर सुईसह बारीक धागा व तंत्राने त्यांची दुरुस्ती केली आहे.

यामुळे ग्लूड जॉईन्टवर होणारा रेल्वेचा साधारण १ कोटी रूपयांचा खर्च वाचला आहे. या अभियंत्याने वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग रेल्वे आता देशभर करण्याच्या तयारीत आहे. तडे गलेल्या रुळाला धाग्याची मलमपट्टी केल्याने अचानक दुर्दैवाने जाणारे हजारोंचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे.

ट्रॅक जोडण्यासाठी रेल्वे ग्लूड जॉईन्ट प्लेट्सचा वापर करते. यामुळे सिग्नलचे आयसोलेट आणि सर्किट्स देखील ग्लूड जॉईन्ट प्लेट्सला जोडले जातात. ग्लूड जॉईन्ट तीन कारणांमुळे फेल होते. यार्ड आणि ब्लॉक विभागात, सिग्नलिंगसाठी प्लेटच्या मध्यभागी रेल लाईनच्या दोन्ही बाजुला इन्सोलेटिंग धातू असतो. एका बाजूला पॉझिटिव्ह डीसी करंट तर एका बाजूला निगेटिव्ह डीसी करंट असते. सिग्नलिंगसाठी याचा वापर केला जातो.

असे तयार केले नवे तंत्रज्ञान

मागील वर्षी जानेवारी २०१९ पर्यंत, ग्लूड जॉईन्ट होण्याच्या बर्‍याच घटना घडल्यात, ज्यामुळे गाड्यांचा वेग कमी करून धिम्या गतीने चालवाव्या लागल्या. रेल्वेने मागील वर्षी केवळ ग्लूड जॉईन्ट रिपेयरच्या मार्गदर्शकाचा ड्राफ्ट बनवण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत सुलतानपूर येथे तैनात सहाय्यक विभागीय अभियंता मंगल यादव यांनी ग्लूड जॉईन्ट फेल होण्याच्या कारणांचा शोध घेतला. ग्लूड जॉईन्टच्या दुरूस्तीसाठी लागणाऱ्या खर्चावर बचत करण्यासाठी त्यांनी जुन्या ग्लूड प्लेट्सचा वापर केला.

त्यानंतर त्यांनी जुन्या ग्लूड प्लेट्सचा वापर करून त्यावर कपडा लपेटला. ग्लूड जॉईन्टच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या बोल्ट नटला फायबर कपडा गुंढाळून धाग्याने बांधला. जेणे करून प्लेट आणि बोल्ट ट्रेन धावत असताना त्यावेळी ते प्लेट्स तुटू नयेत.

देशात ग्लूड दुरुस्तीसाठी सुलतानपूर रेल्वे विभागाचे मॉडेल अवलंबले जाणार आहे. भविष्यात निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता यांनी धोरण तयार करण्यास सांगितले आहे. अभियांत्रिकी अधिकाऱ्याने आठ कर्मचार्‍यांच्या टीमसह उतरेठिया ते सुलतानपूर पर्यंत १४५ ग्लूड प्लेट दुरुस्त केल्या आहेत.


Lockdown Crisis: संकटातही संधी; चीनला मागे टाकण्यासाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’चा पर्याय

First Published on: July 18, 2020 1:35 PM
Exit mobile version