घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटLockdown Crisis: संकटातही संधी; चीनला मागे टाकण्यासाठी 'स्किल डेव्हलपमेंट'चा पर्याय

Lockdown Crisis: संकटातही संधी; चीनला मागे टाकण्यासाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’चा पर्याय

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. महासत्ता म्हणून प्रसिद्ध देश देखील कोरोनापुढे हतबल झालेले आहेत. यातच जगातील जवळपास ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर भारतात देखील एप्रिल ते मे महिन्यात तब्बल १२ कोटी लोकांनी रोजगार गमावला असल्याचे सर्वेक्षण The Centre for Monitoring Indian Economy या संस्थेने केले होते. या १२ कोटीमध्ये रोजंदारीवर काम करणारे, रस्त्यावर वस्तू विकणारे, छोट्या उद्यागोतील कामगार, बांधकाम मजूर अशा घटकांचा समावेश होता. कामगारांसोबत विविध देशांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या २० कोटी विद्यार्थ्यांना देखील लॉकडाऊनचा फटका बसलेला आहे. मात्र या संकटातही स्किल डेव्हलपमेंटवर आपण भर दिला तर इथले युवक चीनला देखील मागू टाकू शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील काही सकारात्मक बदल घडत आहेत. ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या जगातील सर्वात मोठी संस्था असणाऱ्या कोर्सेरा (Coursera) ने आशावादी दृष्टीकोन मांडला आहे. भारतातील ३.७५ कोटी विद्यार्थी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सध्या शैक्षणिक संस्थामध्ये जाऊ शकत नसले तरी ऑनलाईनच्या माध्यमातून ते विविध स्किल डेव्हलपमेंट करु शकतात. भारतात चीनपेक्षाही अधिक संख्येने तरुणांची मोठी संख्या आहे. ग्लोबल स्किल्स इंडेक्स २०२० चा विचार केला तर भारत ३४ स्थानावर असून चीन ४५ व्या स्थानावर आहे.

- Advertisement -

कोर्सेराने ऑनलाईन शिक्षणावर भर देताना म्हटले आहे की, “जर भारताने युवकांच्या स्किल डेव्हलपमेंटवर काम केले तर भारतात नव्या क्षेत्राची दालने युवकांसाठी खुली होऊ शकतात.” जागतिक स्तरावर डेटा सायन्समध्ये भारत ५१ व्या स्थानावर असून आशिया खंडाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास १२ व्या स्थानावर आहे. या क्षेत्रात कौशल्य असलेले सध्या भारतात फक्त ३ टक्के कामगार आहेत. जर या क्षेत्राकडे भारताने आताच लक्ष दिल्यास २०३० पर्यंत भारत चीनलाही मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारत चीनपेक्षाही पुढे आहे. व्यवसाय आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये Global Skills Index 2020 नुसार भारत ३४ व्या क्रमाकांवर असून चीन ४५ व्या स्थानावर आहे. त्यामुळे चीनला मागे टाकण्याची क्षमता भारतामध्ये असल्याचे कोर्सेराचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -