पती- पत्नीच्या नात्यात मंगळसूत्र ठरले घटस्फोटाचं कारण; मद्रास हायकोर्ट म्हणाले…

पती- पत्नीच्या नात्यात मंगळसूत्र ठरले घटस्फोटाचं कारण; मद्रास हायकोर्ट म्हणाले…

बदलती जीवनशैली, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि नातेसंबंधांमध्ये आलेला दूरावा यामुळे भारतात सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. याच घटस्फोटासंबंधीत एका याचिकेवर मद्रास हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. पतीपासून वेगळं राहणाऱ्या पत्नीने मंगळसूत्रातील डौली (मद्रासी पद्धतीचे मंगळसूत्रात एक चैन आणि सोन्याच्या दोन डैल्या असतात.) काढून टाकणे म्हणजे पतीच्या मानसिक क्रुरतेचे प्रमाण ठरेल. असे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केल आहे. असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने पतीच्या घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला आहे.

न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या अपीलला अनुमती देताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. त्यांनी घटस्फोटासाठी स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती, ज्यात पतीच्या घटस्फोटाच्या अर्जाला नकार देण्यात आला होता.

या प्रकरणातील पत्नीची चौकशी केली असता तिने कबूल केले की, पतीपसून वेगळं होण्याच्या वेळी तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्रातील डौली (मद्रासी पद्धतीचे मंगळसूत्र) काढून टाकली होती. मात्र आपण केवळ मंगळसूत्रातील साखळी काढून डौली ठेवल्याचे महिलेने स्पष्ट केले.

यावेळी पत्नीच्या वकिलाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा हवाला देऊन सांगितले की, मंगळसूत्रातील डौली घालणे आवश्यक नाही आणि त्यामुळे पत्नीने ती काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर परिणाम होणार नाही.


… तर वेळ पडल्यास पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन: केसरकरांची भूमिका


First Published on: July 15, 2022 1:26 PM
Exit mobile version