Live Update: बारामतीत शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा मृत्यू

Live Update: बारामतीत शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

घाटकोपर युनिटच्या अँटी नारकोटिक्स सेलची कारवाई; नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.

बारामतीत शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

बारामती शेतात काम सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. पावसादरम्याना विजांचा कडकडाट सुरु झाला. पाऊस सुरु असताना अचानक काळाने घाला घातला. तीन मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दोन जणांता जागीच मृत्यू झाला. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु


मंगळवारी रोजी पुण्याच्या उत्तरत पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तशी माहिती देण्यात आली आहे. लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुले नगर, येरवडा, धानोरी, तसंच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद असणार


आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचं निधन

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचं निधन. प्रयागराजमधील वाघम्बरी मठात घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट (सविस्तर वाचा)


पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रासह रायन थॉर्पलाही जामीन मंजूर


खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान राहुल गांधींना भेटण्याची शक्यता


हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी पवारांसह मुख्यमंत्र्याचे प्रयत्न सुरू, तर मुश्रीफांचे घोटाळे उघड होऊ नये म्हणून कारवाई करण्यात आली – सोमय्या


उद्धव ठाकरे सरकारची दादागिरी सुरू, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर असून सरकारची मुजोरी सुरू – सोमय्या


ही लढाई एक प्रकारची क्रांती आहे. महाराष्ट्रात घोटाळेमुक्त प्रशासन करून दाखवू -सोमय्या

भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणार, उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र बनवला

कोरोना काळात ठाकरे सरकारचा मोठा भ्रष्टाचार, रेमडेसिव्हर औषधांमध्ये घोटाळा केला


किरीट सोमय्या मुंबईत दाखल; भाजप कार्यकर्त्यांकडून मुलुंडमध्ये जंगी स्वागत


राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे.


महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललंय,  सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई होतेय, राज्यात दहशतवादी कारवाई सुरु असताना पोलीस एटीएस शांत, तक्रारदार स्थानपद्ध, गावगुंड मोकाट, महाराष्ट्रात  – आशिष शेलार


देवेंद्र फडणवीस यांची थोड्याच वेळात गोव्यात पत्रकार परिषद


रशियाच्या पर्म युनिव्हर्सिटीमध्ये दहशतवादी हल्ला, ८ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खिडकीतून मारल्या उड्या


राज्य समन्वय समितीची आज दुपारी ४ वाजता बैठक


राज्यातील सुरक्षेविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक, बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहे.


मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात हस्तक्षेप करायला हवा होता- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


जावेद अख्तर मानहाणी प्रकरणी आज सुनावणी


चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पंजाब मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ


कायद्याची लढाई कायद्याने लढा, ईडीची लढाई लढताना त्यांच्या तोंडाला फेस येईल, माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप येत नाही, दोन दिवसांत दोन काँग्रेस नेत्यांची नावं समोर येतील, मुश्राफांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर


सोमय्यांच्या आरोपामागे चंद्रकांत पाटील मुख्य सूत्रधार, सोमय्यांच्या आरोपामागे भाजपाचे षडयंत्र, सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, सोमय्यांविरोधात १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार, ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि जावयाचा सूतवाच संबंध नाही, शरद पवार, उद्धव ठाकरेंचं नाव घेण्याची लायकी आहे का?, चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवून लढाई लढावी, नलावडे साखर कारखान्याशी माझा वैयक्तिक संबंध नाही – हसन मुश्रीफ


मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन घेता आले नाही, ठाकरे सरकारने नवा इतिहास रचला, कोणाच्या आदेशानंतर मला कोंडून ठेवण्य़ात आले, कोणत्या नियमाअंतर्गत मला गणपती विसर्जनसाठी जाण्यापासून रोखलं, मुंबई पोलिसांनी मला धक्काबुक्की करुन रोखलं, ठाकरे सरकारमधील बनावट नोटीस दाखवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, गनिमी काव्याने सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो ही माहिती का लपवली.

मुश्रिफांविरोधात ईडीला पुराव्यासह माहिती देणार, मुश्रिफांची भीतीपोटी माझ्यावर कारवाई, शिवसेनेने मला दोन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुश्रिफांचा आप्पासाहेब गडहिंगलज साखर कारखान्यात घोटाळा केला, पुढच्या आठवड्यात मुश्रिफांचा तिसरा घोटाळा उघड करणार, पवार आणि ठाकरे मविआ सरकार चालवतात, गृहमंत्र्यालय पवारांकडे आहे, गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार, सोमवारी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील जमिनीची पाहणी करणार, २७ सप्टेंबरला कोलाई गावातील जमिनीची पाहणी करणार, मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्य़ा जीवाला धोका- किरीट सोमय्या,

कराड सर्किट हाउसवर किरीट सोमय्या थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद, मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड करणारा- किरीट सोमय्या


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.  किरीट सोमय्यांना देणार उत्तर


चरणजीत सिंह चन्नी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चन्नी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.


किरीट सोमय्या आज सकाळी १० वाजता घेणार पत्रकार परिषद, पोलिसांनी सोमय्यांना कराड रेल्वे स्थानकावर उतरवलं, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सोमय्या मुंबईला रवाना होणार, सोमय्या सध्या कराड विश्रागृहात


 

First Published on: September 20, 2021 10:30 PM
Exit mobile version