घरताज्या घडामोडीआखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचं निधन; प्रयागराजमधील वाघम्बरी मठात घेतला...

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचं निधन; प्रयागराजमधील वाघम्बरी मठात घेतला अखेरचा श्वास

Subscribe

प्रयागराजच्या वाघम्बरी मठातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळला. दरम्यान, फॉरेन्सिक टीम आणि विशेष टीम तपास करत आहे, वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी नरेंद्र गिरी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यामुळे वादामुळे चर्चेत होते. स्वामी आनंद गिरी यांच्यावर कुटुंब आणि मठ आणि मंदिराच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आखाडा, मठ आणि मंदिरातून हद्दपार झाल्यानंतर आनंद गिरी यांनी त्यांचे गुरु महंत नरेंद्र गिरी यांच्या विरोधात अनेक विधाने देखील केल्याचे समोर आले होते. त्याच्यावर अनेक आरोपही करण्यात आले. त्यानंतर त्वरीत आखाडा परिषदेनेही या विषयावर बैठक बोलावली होती. मात्र, अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातील वाद गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपल्याची माहिती मिळतेय.

महंत नरेंद्र गिरी यांची ही हत्या की आत्महत्या, त्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या माहितीनंतर संपूर्ण परिसरात तणाव पसरला आहे. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन हे प्रकरण आत्महत्येचे असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -