श्रद्धा हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी, अमित शाहांचे आदेश

श्रद्धा हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी, अमित शाहांचे आदेश

नवी दिल्ली – श्रद्धा हत्येप्रकरणी (Shraddha Murder Case) गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी महाराष्ट्र पोलिसांवर (Maharashtra Police) निशाणा साधला. श्रद्धाने तुळींज पोलिसांना लेखी तक्रार दिली होती, तरीही त्यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं अमित शाहा म्हमाले. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा दिल्ली एम्स रुग्णालयातील सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांचे निलंबन, पोलिसांकडून तपास सुरु

श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० मध्येच तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने आफताब आपली हत्या करू शकतो, असं म्हटलं होतं. या तक्रार अर्जाचा दाखला देत अमित शहांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रद्धाने आधीच भिती व्यक्त केली होती, मग पोलिसांनी आफताबविरोधात कारवाई का केली नाही, असा प्रश्न अमित शाहांनी उपस्थित केलाय.

तसंच, या प्रकरणी अमित शाहा जातीने लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझं संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल,” असं अमित शाहा म्हणाले.

हेही वाचा – श्रद्धा हत्याप्रकरणी मुंबईत चौकशी, जबड्याचा भाग दंतचिकित्सकाकडून पडताळणार

श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० मध्ये आफताबविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी २६ दिवस याप्रकरणाचा तपास केला. मात्र, दोघांमध्येही समझोता झाला असल्याने तक्रार मागे घेण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर केला, आफताबच्या चौकशीतून उघड

First Published on: November 25, 2022 1:25 PM
Exit mobile version