Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश श्रद्धा हत्याप्रकरणी मुंबईत चौकशी, जबड्याचा भाग दंतचिकित्सकाकडून पडताळणार

श्रद्धा हत्याप्रकरणी मुंबईत चौकशी, जबड्याचा भाग दंतचिकित्सकाकडून पडताळणार

Subscribe

आफताबने उत्तरे दिली असली तरीही त्याच्या प्रत्येक उत्तरावर तपास अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणात त्याची नार्को चाचणीही करण्यात येणार आहे. पॉलीग्राफ चाचणीमुळे नार्को चाचणी लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास रिमांड संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीतही आफताबची नार्को चाचणी होऊ शकते.

नवी दिल्ली – श्रद्धा हत्याप्रकरणात (Shraddha Murder Case) तिच्या जबड्याचा भाग पोलिसांना सापडला आहे. हा जबड्याचा भाग आता तिच्या डेंटिस्टच्या अहवालाशी (Dentist Report) पडताळून पाहणार आहेत. मुंबईतील एका डेंटिस्टकडे श्रद्धा उपचारांसाठी गेली होती. त्यामुळे, तपासादरम्यान पोलिसांना सापडलेल्या जबड्याचा भाग दंतचिकित्सकांच्या अहवालाशी पडताळून पाहणार आहेत.

हेही वाचा – श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर केला, आफताबच्या चौकशीतून उघड

- Advertisement -

श्रद्धा हत्याप्रकरणात मुंबईतील डेंटिस्टची साक्ष घेण्यात आली होती. ही साक्ष महत्त्वाची ठरू शकणार आहे. या डेंटिस्टने गेल्या वर्षी श्रद्धावर उपचार केले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना या डॉक्टरने सांगितले की, श्रद्धासोबत आफताबही दोन-तीन वेळा त्यांच्याकडे आला होता. श्रद्धा हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांसमोर आफताबने जप्त केलेले शरीराचे अवयव श्रद्धाचे असल्याचे सिद्ध करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यानंतरच आफताबविरुद्ध ठोस पुरावा म्हणून न्यायालयात सादर करता येईल.

हेही वाचा आफताब देतोय तुकडे करुन ठार मारण्याची धमकी…; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने केली होती तक्रार

- Advertisement -

जंगलात आणि तलावात सापडलेल्या हाडांशिवाय पोलिसांनी कपडे आणि इतर वस्तूही तपासणीसाठी सीएफएसएलकडे पाठवल्या आहेत. यासोबतच जबड्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मुंबईतील एक डेंटिस्टही सापडला, ज्याने श्रद्धावर उपचार केले. दंतचिकित्सक डॉ. इशान मोटा यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या टीमसमोर सांगितले की, 2021 च्या ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान श्रद्धा 7-8 वेळा त्यांच्याकडे आली होती आणि यादरम्यान रूट कॅनाल उपचारांसह तिची अक्कल दाढ काढण्यात आली होती.

डॉ. इशान मोटा यांनी सांगितले की, आफताबही श्रद्धासोबत दोन-तीन वेळा त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता, पण आफताबशी त्यांचे काहीही बोलणे झाले नाही. वैद्यकीय उपचाराचा खर्च श्रद्धाच्या क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना सापडलेला जबडा श्रद्धाच्या दातांच्या एक्स-रे रिपोर्टशी जुळवून पाहणार आहेत. डॉ. ईशानने श्रद्धाच्या उपचाराशी संबंधित सर्व कागदपत्रे तपास पथकाला दिली आहेत, ज्यामुळे तपासात मदत होऊ शकते.

पोलिस तपासात आतापर्यंत जप्त केलेल्या गोष्टींबाबत सीएसएफएलचा अहवालही लवकरच येऊ शकतो, ज्यामुळे आफताबविरुद्धच्या पुरावे सिद्ध होतील. आफताबने श्रद्धाच्या हत्येपूर्वी आणि नंतर काय केले याचाही तपास दिल्ली आणि महाराष्ट्र पोलीस करत आहेत. त्याने इंटरनेटवर काय शोधले? खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना त्याला कशी सुचली, आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.


या प्रकरणाच्या तपास अहवालात आफताबने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. त्यानुसार आफताबने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तो आणि श्रद्धा 2019 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हे दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले. श्रद्धा आणि आफताबमध्ये खूप भांडणं व्हायची. आफताब आणि श्रद्धा मार्च-एप्रिलमध्ये फिरायला गेले होते. यानंतर दोघांनीही दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले.

आफताबची पॉलीग्राफ चाचणी आजही होऊ शकते. गुरुवारी आफताबची दिल्लीच्या एफएसएलमध्ये ९.३० तास पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. पॉलीग्राफ चाचणीपूर्वी आफताबची शारीरिक, मानसिक तपासणी करण्यात आली. याद्वारे आफताबची ब्रेन मॅपिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पॉलिग्राफ चाचणी का?

आपल्या प्रेयसीच्या शरीराचे ३५ तुकडे करूनही आफताबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेष दिसत नाहीय. तो सुरुवातीपासून शांतपणाने वागत आहे. त्याच्या चेहऱ्यावर निश्चिंत भाव दिसत आहेत. त्यामुळे त्याच्या ब्रेन मॅपिंगसाठी पॉलिग्राफ चाचणी करण्यात येतेय. मंगळवारी त्याला पॉलिग्राफ चाचणीसाठी घेऊन जात असतानाही तो शांत आणि बेफिकीर दिसत होता.

हेही वाचा मांस खाण्यावरून आफताबची सक्ती; श्रद्धाच्या शेजारच्यांचा दावा

साडेनऊ तास चौकशी

गुरुवारी आफताब पूनावाला याची पॉलीग्राफ चाचणी दिल्लीतील रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत म्हणजेच एफएसएलमध्ये झाली. तब्बल साडेनऊ तास आफताबची चौकशी करण्यात आली. ही चौकशी अर्धवट राहिल्याने आज पुन्हा त्याची पॉलग्राफ चाचणी होणार आहे.

पॉलीग्राफ चाचणीची प्रक्रिया मंगळवारीच सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांनी पॉलीग्राफ चाचणीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी तज्ज्ञ डॉक्टरांकडे सोपवली आहे. आफताबच्या प्रत्येक उत्तरावर तज्ज्ञांचं बारीक लक्ष होतं. तो उत्तर सांगत असताना त्याचा रक्तदाब, नाडी आणि नाडीतील चढउतार, मानसशास्त्रावर लक्ष ठेवलं गेलं.

नार्को चाचणी लांबणार

आफताबने उत्तरे दिली असली तरीही त्याच्या प्रत्येक उत्तरावर तपास अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे याप्रकरणात त्याची नार्को चाचणीही करण्यात येणार आहे. पॉलीग्राफ चाचणीमुळे नार्को चाचणी लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास रिमांड संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीतही आफताबची नार्को चाचणी होऊ शकते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -