मार्चमध्ये विक्रमी 1.42 कोटी रुपयांचा कर जमा

मार्चमध्ये विक्रमी 1.42 कोटी रुपयांचा कर जमा

देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा लागू झाल्यापासून मार्चमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कर जमा झाला आहे. मार्चमध्ये 1.42 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये 1.40 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी या करवसुलीसंदर्भात माहिती दिली. गेल्या वर्षी, मार्च 2021 च्या तुलनेत या वर्षी जीएसटीतून जमा झालेली रक्कम 15 टक्क्यांनी जास्त आहे. मार्च 2020 च्या तुलनेत ही रक्कम 46 टक्क्यांनी जास्त आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यामध्ये 1,42,095 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. त्यामध्ये केंद्राच्या (सीजीएसटी) जीएसटीचा हिस्सा 25, 830 कोटी रुपये आणि राज्याच्या (एसजीएसटी) जीएसटीचा हिस्सा हा 32,378 कोटी रुपये इतका आहे. एकात्मिक (आयजीएसटी) जीएसटीचा हिस्सा हा 39,131 कोटी रुपये आणि सेसचे योगदान हे 9417 कोटी रुपये इतके आहे. यामधील 981 कोटी रुपयांची मिळकत ही सामानांच्या आयातीवरील आहे.


 

First Published on: April 2, 2022 5:25 AM
Exit mobile version