‘ओबामा केअर’च्या धर्तीवर ‘मोदी केअर’!

‘ओबामा केअर’च्या धर्तीवर ‘मोदी केअर’!

नरेंद्र मोदी ( फोटो सौजन्य . युट्युब. कॉम )

देशातील नागरिकांना आरोग्य विमा कवच देण्यासाठी मोदी केअर योजनेची सुरूवात होणार आहे. या योजनेतंर्गत देशातील ५० कोटी लोकांना ५ लाख रूपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये, १३५२ प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाच्या आणि एनएचपीएमच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. अमेरिकेतील ‘ओबामा केअर’ या योजनेच्या धर्तीवर आता भारतात देखील मोदी केअरची सुरुवात…

मोदी केअर नेमकी कशी आहे?

या योजनेतंर्गत गुडघा प्रत्यारोपण, बायपास सर्जरी, ऑर्थोस्कोपी सर्जरी, गुडघ्याची शस्त्रक्रिया, हिप रिप्लेसमेंट, गर्भाशय बदलणे यासारख्या प्रमुख शस्त्रक्रियांचा समावेश आहे. परिणामी, सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या या शस्त्रक्रिया वाजवी दरात करून मिळणार आहेत. आर्थिक परिस्थितीनुसारच तुम्हाला या योजनेचा लाभ उठवता येणार आहे. या योजनेतंर्गत टीबी पेशंटला प्रत्येक महिना ५०० रूपयांची आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे. मोदी केअरचा फायदा हा देशातल्या तब्बल ४० टक्के लोकांना होणार आहे. शिवाय या योजनेतंर्गत देशात २४ नवीन मेडिकल कॉलेज, ३ लोकसभा मतदार संघामध्ये १ मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.

मोदी केअरचा कसा होणार फायदा?

देशातल्या अनेक भागात सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पाहायाला मिळतेय. शिवाय आर्थिक विषमतेमुळे अनेक नागरिक हे मोठ्या आजारांवर उपचार घेण्यापासून वंचित राहतात. पण, मोदी केअर योजना अंमलात आल्यास त्याचा फायदा हा गरिब आणि मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. शिवाय आरोग्य व्यवस्था सुधारण्यास देखील त्याचा फायदा होणार आहे.

ओबामा केअरबद्दल…

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या मेडिकल व्यवस्थेमध्ये काही बदल केले होते. ही योजना ओबामा केअर नावाने ओळखली जाऊ लागली. त्यासाठी पीपीएसीए अर्थात पेशंट प्रोटेक्शन आणि अफोर्टेबल केअर अॅक्ट हा कायदा २३ मार्च २०१० रोजी बनवला गेला. या योजनेतंर्गत मेडिकल इंन्शुरन्स, परवडणाऱ्या दरात औषधे आणि लोकांच्यावतीने आरोग्यावर खर्च होणाऱ्या किमती कमी करणे असा उद्देश होता. त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेलचा फायदा हा अमेरिकेत्या लोकांना मोठ्या प्रमाणावर झाला. पण, ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच ओबामा केअर बंद करण्याचा निर्णय घेतला.

First Published on: May 24, 2018 11:06 AM
Exit mobile version