मोदींनी आणखी एक सरकारी कंपनी विकली, दोन वर्ष बंद कंपनीला टाटांनी घेतलं विकत

मोदींनी आणखी एक सरकारी कंपनी विकली, दोन वर्ष बंद कंपनीला टाटांनी घेतलं विकत

केंद्रात भाजपचं सरकार (BJP Government) आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अनेक सरकारी कंपन्या विकल्या आहेत. या खाजगीकरणाविरोधात (Privatization) अनेकांनी आवाज उठवला तरीही अनेक कंपन्यांचं खासजीकरण सुरूच आहे. दरम्यान, मोदी सरकारने आणखी एक कंपनी विकली असल्याचं समोर आलं आहे. मात्र, भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी ही कंपनी विकत घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीची चांदी झाली आहे. नीलाचल इस्पात निगम लिमिडेट असं या कंपनीचं नाव आहे. (Modi government sell one more company, Ratan Tata take it over)

हेही वाचा – रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

गेल्या दोन वर्षांपासून ओडिसातील नीलाचल इस्पात निगम लिमिडेट कंपनी बंद होती. मात्र, रतन टाटा यांनी ही कंपनी विकत घेताच या कंपनीचं नशीब उजळलं आहे. टाटा स्टीलचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संस्थापक टी.वी. नरेंद्रन यांनी सांगितलं की, नीलाचल इस्पातचा कारखाना पुढच्या तीन महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच, ही कंपनी आता लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

टाटा ग्रुपच्या एका फर्मला ही कंपनी सोपवण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, टाटा स्टीलच्या युनिट टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्सने यावर्षी जानेवारी महिन्यात १२ हजार १०० कोटी रुपयांची एन्टरप्राईज मूल्यावर एनआयएनएलमध्ये ९३.७१ टक्के भागीदारी करण्याची बोली जिंकली होती.

हेही वाचा – देशातील या 2 बड्या बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ठोठावला 1 कोटींचा दंड

कंपनी काम काय करते?

नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ओडिसास्थित १.१ मॅट्रिक टन क्षमता असलेला एक स्टिल प्लांट आहे. ही सरकारी कंपनी तोट्यात होती, त्यामुळे ३० मार्च २०२० पासून बंदच होती. कंपनीवर ३१ मार्च २०२१ रोजी ६,६०० कोटी रुपये कर्ज होते. यामध्ये प्रमोटर ४,११६ कोटी रुपये, बँकांचं १,७४१ कोटी कर्ज आहेत.

First Published on: July 25, 2022 10:16 AM
Exit mobile version