रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.58 निच्चांकी स्तरावर घसरला, तर 5 जुलै 2022 रोजी रुपया 79.38 इतका घसरला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

rupee dollar

डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज ऐतिहासिक घसरण झाली आहे. आज ८० रुपये प्रति रुपयाची घसरण झाली असून यावर्षी एकूण सात टक्क्यांची घसरण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.58 निच्चांकी स्तरावर घसरला, तर 5 जुलै 2022 रोजी रुपया 79.38 इतका घसरला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Rupee Hits 80 Per Dollar For The First Time Ever)

हेही वाचा – दही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

संसदेत पावसाळी अधिवेशाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी रुपयाच्या अवमुल्यनाबाबत सरकारला धारेवर धरले. मात्र, सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केलं नाही. आरबीआयकडूनही रुपयाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने काही कडक धोरणं अवलंबिली आहेत. त्यामुळे रुपया घसरत आहे, असं म्हटलं जातंय. तसेच यामुळे गुंतवणूकदार डॉलर इंडेक्सकडे वळत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे.

हेही वाचा – यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 बेसिस पॉइंटने केली वाढ, 1994 नंतरची सर्वात मोठी वाढ

रुपया घसरल्याने याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. इंधन दर सातत्याने वाढत असून रुपयाच्या घसरणीमुळे इंधन दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या वस्तू आयात केल्या जातात त्याच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आधीच गगनाला भिडलेली महागाई आता आणखी वाढू शकते असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.