Monkeypox Virus ने वाढवली जगाची चिंता; केंद्रानंतर महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Monkeypox Virus ने वाढवली जगाची चिंता; केंद्रानंतर महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

जगभरात कोरोना महामारीचा प्रकोप कुठे मंद होत असताना आता मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या आजाराने जगाची चिंता वाढवली आहे. जगभरात मंकीपॉक्स रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतेय. आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले. WHO च्या माहितीनुसार, मंकीपॉक्स (Monkeypox Virus Cases) हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार आहे. या विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतोय. भारतात अद्यापही मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र इतर देशांतील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने (Monkeypox Virus Cases in India) सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर आता राज्यांतील आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या सुचनानंतर आता सर्व राज्यांमध्येही मंकीपॉक्सबाबत सतर्क केले जातेय.(Monkeypox Virus Advisory)

राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्राने हे प्रकरण गांभीर्याने घेत देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर आणि देशांच्या सीमाभागांत लक्ष केंद्रीय केलेय. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील नव्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

महाराष्ट्रात मंकीपॉक्सबाबत लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सुचना

१) गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्स प्रभाविक देशांमधून प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

२) या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला दिली जाईल.

३) संशयित रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.

४) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाईल.

५) रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

६) गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवत त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

७) जोपर्यंत संशयित रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही आणि त्याच्या त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत त्याला क्वारंटाईनमधून सोडता येणार नाही.

मंकीपॉक्स आजार नेमका आला कुठून?

दरम्यान युरोपियन (Europe) देशांमध्ये मंकीपॉक्सचा पहिला केस 7 मे रोजी समोर आला होता. ती व्यक्तीही नायजेरियातून आली होती. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे आफ्रिकन देशांमध्ये आढळून येत आहेत. 2017 पासून याठिकाणी ही प्रकरणे वाढत आहेत. पण चिंताजनक ट्रेंड म्हणजे आता या देशानंतर युरोपही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. (monkeypox disease)

आत्तापर्यंत झालेल्या संशोधन असे सिद्ध झाले की, चेचक या आजाराविरुद्ध वापरलेली लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरत आहे. त्यातील 85 टक्के लस प्रभावी मानली गेली आहे. मात्र या आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्येही कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसल्याते समोर आले आहे.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे (monkeypox disease symptoms)

मंकीपॉक्स (Monkeypox Europe) आजाराच्या लक्षणांबद्ल सांगायचे झाल्या, या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक सारखा दिसतो. एक ते तीन दिवस ताप आल्यावर त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पिंपल्स येतात. हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसतात. हे मुरुम जखमासारखे दिसतात आणि स्वतःच सुकतात आणि पडतात.


Live Update : संजय राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याचा १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा


First Published on: May 23, 2022 1:54 PM
Exit mobile version