मान्सून केरळात दाखल; प्रतीक्षा संपली!

मान्सून केरळात दाखल; प्रतीक्षा संपली!

मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर पाऊस केरळात दाखल झाला आहे. मात्र महाराष्ट्राला पाऊसासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. केरळ तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये शनिवारी येणारा पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यायला १७ जून उजाडणार आहे.  मात्र आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ आहे. मुंबई उपनगरात रिमझीम पाऊसाची सरी पडल्या..

गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी ७ जून ते १३ जून या काळात पाऊस धडकण्याची शक्यता आहे. तरच्या आठवडय़ात (२१ ते २७ जून) या कालावधीत बंगालच्या उपसागरातून येणारा पाऊस विदर्भापर्यंत पोहचेल. मात्र पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी जूनअखेरच (२८ जून ते ४ जुलै) उजाडणार आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रत्यक्ष आगमन झाल्यानंतरच विस्तारित पाऊस अनुमानाच्या आधारे पेरण्या उशिरा करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.

विस्तारित पाऊस अनुमान या प्रक्रियेत प्रत्येक आठवडय़ात देशभरातील हवामानाचा वेध घेतला जातो. या अनुमानानुसार महाराष्ट्रातील जून महिन्याचे पावसाचे प्रमाण हे मर्यादितच राहणार असल्याचे दिसून येते.हवामान विभागाचा अंदाज ज्या मॉडेल्सवर आधारित आहे, त्या मॉडेलनुसार सर्वाधिक अचूक अंदाज दोन आठवड्यांपर्यंत देता येतो. त्यामुळे राज्यातील पावसासंदर्भात अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागेल’, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 8, 2019 9:15 AM
Exit mobile version