आसामच्या ब्रम्हपूत्रा नदीत प्रवासी बोट बुडाली; एकाचा मृत्यू

आसामच्या ब्रम्हपूत्रा नदीत प्रवासी बोट बुडाली; एकाचा मृत्यू

ब्रम्हपुत्रा नदीत प्रवासी बोट बुडाली

आसाममध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. गुवाहाटीजवळ ब्रम्हपुत्रा नदीमध्ये ही घटना घडली आहे. बोटीमधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर १२ प्रवाशांनी पोहून किनारा गाठला. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर ३२ प्रवासी बेपत्ता आहे. बोटीमधील उर्वरीत प्रवासी बेपत्ता असून स्थानक नागरिक, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.

१२ प्रवासी सुखरुप

दुर्घटनाग्रस्त बोटी ४५ प्रवासी आणि ८ सायकल घेऊन जात होती. बोट बुडाल्यानंतर १२ जण सुरक्षित नदीकाठी आले मात्र इतर जण बेपत्ता झाले आहेत. गुवाहाटीवरुन उत्तर गुवाहाटीला ही बोट जात होती. बेपत्तामध्ये महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचा जास्त समावेश आहे. एनडीआरएफची २५ जणांच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.

इंजिन बंद पडले आणि बोट बुडाली

दोन तासानंतर एनडीआरएफच्या टीमने बेपत्ता झालेल्यांपैकी एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला. सध्या शर्थीने बचावकार्य सुरु आहे. बोट किनाऱ्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर गेल्यावर तिचे इंजिन अचानक बंद पडले आणि बोट बुडाली.

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते

आसाम इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, फक्त २२ तिकीट विकल्या गेल्या होत्या मात्र बोटीमध्ये जास्त प्रवासी प्रवास करत होते. आसामच्या या विभागाकडून लायसन्स घेऊन प्रायव्हेट कंपनीद्वारे बोट चालवल्या जातत. ज्याच्या मदतीने हजारो प्रवासी नदी पलिकडे जातात.

First Published on: September 5, 2018 6:57 PM
Exit mobile version