मुलायम सिंह यादव ICU मध्ये, प्रकृती चिंताजनक

मुलायम सिंह यादव ICU मध्ये, प्रकृती चिंताजनक

akhilesh yadav

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मेदांतामध्येच शिवपाल यादव आणि प्रतीक यादवही सध्या उपस्थित आहेत. अखिलेश यादव आणि अपर्णा यादव अचानक दिल्लीला रवाना झालेत. डॉ. नरेश त्रेहन स्वतः मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

जवळपास ८२ वर्षांचे मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली होती. जूनमध्ये त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत त्यांना हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब खालावल्याचे दिसून आले.


मिळालेल्या माहितीनुसार, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहन स्वतः मुलायम सिंह यादव यांच्यावर देखरेख करीत आहेत. शिवपाल यादव आणि मुलायम यांचा दुसरा मुलगा प्रतीक यादव हे आधीच दिल्लीत आहेत. त्याच वेळी अखिलेश यादव आणि अपर्णा यादवही प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त ऐकून दिल्लीला रवाना झाले. मुलायम सिंह 22 ऑगस्टपासून मेदांता रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर कर्करोगतज्ज्ञ डॉ. नितीन सूद यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला, जिथे विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्रकृती गंभीर असून डॉक्टर सतत त्यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचाः नवी मुंबई शहर पुन्हा एकदा स्वच्छता यादीत, 2022 च्या स्वच्छता सर्व्हेक्षणांतर्गत महाराष्ट्रातून तिसऱ्या स्थानी

First Published on: October 2, 2022 5:39 PM
Exit mobile version