मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेने दिलं कारण

मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेने दिलं कारण

जेनेवा – कोरोनानंतर जगभर मंकीपॉक्स (MonkeyPox) या संसर्गजन्य आजाराची दहशत पसरली होती. जगभरातील विविध देशात आजही मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच, मंकीपॉक्स या आजाराचे नाव बदलण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) याबाबत माहिती दिली आहे. एमपॉक्स (MPox) असं या आजाराचं नाव ठेवण्यात आलं असून MPox आणि MonkeyPox अशी दोन्ही नावं पुढील वर्षभर वापरली जाणार आहेत. त्यानंतर, मंकीपॉक्सचा धोका कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा तू कसाबसारखा आहेस…, विद्यार्थ्याची दहशतवाद्याशी तुलना केल्याने महाविद्यालयाकडून प्राध्यापक निलंबित

१९५८ मध्ये माकडांमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू सर्वप्रथम आढळला होता. ब्रिटनमध्ये या आजाराची प्रकरणे समोर आली होती. त्यावेळी संसर्ग रोखण्यासाठी माकडांना विष देऊन मारून टाकण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस म्हणाल्या की, मंकीपॉक्स प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकते. परंतु यासाठी माकड जबाबदार नाहीत.

कोरोना संसर्गाचा धोका कमी झाल्यानंतर जगभरात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढू लागला. मे महिन्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर, भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण सापडू लागले. जगभरात ८० हजार रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत ५५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोविड व्हॅक्सीनला मंजूरी

नाव बदलण्यामागचं कारण काय?

मंकीपॉक्सचा संसर्ग वाढल्याने वर्णद्वेषी, भेदभावपूर्ण आणि आक्षेपार्ह भाषा वापरली गेली. तसंच, हा आजार माकडामुळे पसरत असल्याची अफवा पसरली गेली. त्यामुळे लोकांमधील गोंधळ कमी व्हावा याकरता मंकीपॉक्स या आजाराचे नाव बदलून एमपॉक्स असे करण्यात आले आहे.

First Published on: November 29, 2022 12:00 PM
Exit mobile version