National Doctor’s Day 2021: दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टरांना करणार संबोधित

National Doctor’s Day 2021: दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टरांना करणार संबोधित

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 वाजता जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त देशातील डॉक्टर्स कम्यूनिटीशी निगडीत सर्व लोकांना संबोधित करणार आहे. भारतीय चिकित्सा संघ (आईएमए) द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. दरवरर्षी एक जुलैला देशभरामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. याच दिवशी देशाचे महान डॉक्टर तसेच पश्चिम बंगालचे दूसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांच्या स्मरणार्थ,आदरार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. डॉक्टर्स कम्यूनिटीने कोव्हिड-19 महामारी काळात महत्वाची भूमिका निभावली आहे. आणि या कठिण काळात सुद्धा आपल्या जिवाची तमा न बाळगता प्रत्येक डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच देशाला संबोधित करतांना भाषणा दरम्यान या महामारीच्या कळात फ्रंटलाईन वर्क्ररने केलेल्या कामगिरीबद्दल व्यक्त होत असतात त्यांची प्रशंसा करतात
डिजिटल इंडिया योजनेच्या लाभार्थिसोबत साधणार संवाद
डॉक्टरांना संबोधीत करण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता डिजिटल इंडिया योजनेच्या लाभार्थिंसोबत संवाद साधणार आहेत. आज सरकारच्या या महत्वपूर्ण घटणेला आज सहा वर्ष पुर्ण झाली आहेत. डिजिटल इंडिया भारत देशाला डिजिटल रूपात सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थामध्ये रुपांतरीत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. एक एप्रिलला आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम केंद्रीय सूचना प्रौद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उद्घाटन संबोधना पासून सुरू होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयने ने केलेल्या वक्तव्यात असे म्हंटले आहे की, “कार्यक्रमात डिजिटल इंडिया च्या महत्वपूर्ण उपलब्धता बद्धल एक व्हिडिओ प्रस्तुत करण्यात येणार आहे. यानंतर प्रधानमंत्री डिजिटल इंडियाच्या अनेक योजनांच्या लाभार्थियांसोबत संवाद साधतील. मंत्रालयाचे सचिव अजय साहनी कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत.”
सर्व भाषण तसेच संबोधन प्रेस काँफंरन्स अतर्गत आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचे डिजिटल इंडियाच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलसारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाइव प्रसारण करण्यात येणार आहे.



हे हि वाचा – New Ruls: आजपासून चेक बुक ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत बदलणार बँकिंगचे नियम



 

First Published on: July 1, 2021 8:53 AM
Exit mobile version