NEET-JEE: परीक्षा केंद्रात वाढ, एका खोलीत १२ विद्यार्थी, अशी होणार NEET-JEE ची परीक्षा

NEET-JEE: परीक्षा केंद्रात वाढ, एका खोलीत १२ विद्यार्थी, अशी होणार NEET-JEE ची परीक्षा

कोरोना संकटाच्या काळात होणाऱ्या नीट-जेईई (NEET-JEE) परीक्षा ही चिंतेचा विषय बनली आहे. विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या विरोधाला डोळेझाक करत आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक विनीत जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी आणि परीक्षेच्या तयारीविषयी माहिती दिली आहे. विनीत जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात खबरदारी कशी घ्यावी आणि मार्गदर्शक तत्त्वे कशाप्रकारे राबवता येतील, त्याचे प्रशिक्षण सर्वांना देण्यात येत आहे. ते स्वत: या प्रशिक्षण विभागात सामील असल्याचे त्यांनी सांगितले. NTA च्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी कोरोना संकटामुळे परीक्षा केंद्र आणि दक्षता घेणाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मागील वर्षी एकूण २५४६ केंद्रे होती, परंतु आता ती वाढवून ३८४२ करण्यात आली आहे.

वर्गात फक्त १२ विद्यार्थी

सोशल डिस्टंसिंगविषयी विनीत जोशी म्हणाले की, पूर्वी २५ विद्यार्थी वर्गात बसत असत, परंतु आता फक्त १२ मुले बसवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांविषयी एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की आम्ही ABHYAS App तयार केले आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत हे App १६ लाख वेळा डाउनलोड केला गेला आहे, तर विद्यार्थ्यांनी App वरच जवळजवळ १०० चाचण्या केल्या आहेत.

NEET व्यतिरिक्त JEE परीक्षांबाबत त्यांनी सांगितले की यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑड-इव्हन सिस्टम (सम-विषम प्रणाली) लागू केली गेली आहे. कोरोना विषाणूमुळे सरकार परीक्षेसाठी आग्रही आहे. सुमारे तीन तासांत चार लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश पत्रे डाउनलोड केली. एनटीएने आधीच स्पष्ट केले आहे की परीक्षेची तारीख आणखी वाढविली जाणार नाही, सुमारे २३ लाख मुले दोन्ही परीक्षांना हजर राहतील.

जवळपास २० लाख विद्यार्थ्यांना NEET-JEE परीक्षा द्यायची आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अनेक राज्य सरकारे आणि राजकीय पक्षही अशीच मागणी करत आहेत. तथापि, काही दिवसांपूर्वीच एनटीएकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती की सप्टेंबर महिन्यात निर्धारित वेळेत अर्थात परीक्षा घेण्यात येणार आहेत. एनटीएने परीक्षांचे मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

 

First Published on: August 26, 2020 11:15 PM
Exit mobile version