सावधान! Netflix तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं!

सावधान! Netflix तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं!

महाराष्ट्र सायबर विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सची फेक वेबसाइट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सायबर भामट्यांपासून सावध रहावं, असे आवाहन करण्यात आलं आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे.

नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग फेल संदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. या मेलमध्ये नेटफ्लिक्स सदस्यता २४ तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकजण त्यांचे बिल पेमेन्ट पूर्ण करण्यासाठी त्यामेलमधील लिंक वर क्लिक करतात. त्या सदस्याने त्या लिंकवर क्लिक केल्यावर नेटफ्लिक्सची फेक वेबसाइट ओपन होते.

त्यानंतर वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते.

महाराष्ट्र सायबरचं आवाहन

१. वापरकर्त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक करताना कंपनीचा ओरिजन लोगो आहे की नाही हे बघावे.

२. आलेल्या ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा.

३. सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये.

४. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अँट्यचमेंट डाउनलोड करू नका.

५. आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका.


हे ही वाचा – खुशखबर! एसटीने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही


First Published on: August 4, 2020 6:38 PM
Exit mobile version