Corona: चिंता वाढली, देशातील रुग्णांची संख्या ८ हजारांहून अधिक

Corona: चिंता वाढली, देशातील रुग्णांची संख्या ८ हजारांहून अधिक

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात भारतात कोरोना व्हायरसने वेगाने धुमाकूळ घातल्याचे  पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार २४ तासांमध्ये ९०९ नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने ३४ लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरस रूग्णांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ७ हजार ३६७ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून ७१६ रूणांनी कोरोनावर यशस्वी मात करून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

कोरोना व्हायरस देशात महामारीचे रूप घेताना दिसत असून कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून अथक प्रयत्न देखील सुरू आहेत. याकरता देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र आता हा लॉकडाऊन १६ दिवसांनी वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आला आहे.


Coronavirus : मुंबईमध्ये कोरोना बाधितांची संख्या ११८२ वर; कोरोनाबाधित ११ रुग्णांचा मृत्यू

जगभरात जवळपास १७ लाख ८० हजार रुग्ण

जगभरात कोरोनाचे जवळपास १७ लाख ८० हजार रुग्ण झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या १ लाख ८ हजारांवर गेली आहे. तर ४ लाख ३ हजार रुग्ण बरे झाले आहेत, जवळपास १२ लाख ६८ हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील ४ टक्के म्हणजे ५० हजार ५९० रूग्ण गंभीर आहेत.

First Published on: April 12, 2020 11:53 AM
Exit mobile version