‘आता ४१ वर्षांनीच मी मंदिरात येणार’

‘आता ४१ वर्षांनीच मी मंदिरात येणार’

नऊ वर्षाच्या मुलीचे शबरीमाला मंदिराबाहेर निदर्शने

केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाविषयी गदारोळ सुरु असताना सोशल मीडियावर एक नऊ वर्षाच्या मुलीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये या नऊ वर्षाच्या मुलीने महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या निर्णयांचे समर्थन केले आहे. फोटोतील मुलगी हातात पोस्टर घेऊन शबरीमाला मंदिरात उभी आहे. या पोस्टरमध्ये आपण ४१ वर्षांनीच म्हणजेच ५० व्या वयात दर्शनाला येऊ, असे लिहिले आहे.

काय लिहिले होते पोस्टरवर ?

रविवारी ९ वर्षाची मुलगी शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी आली होती. त्यावेळी तिच्या हातात पोस्टर होते. तिने त्या पोस्टरमध्ये लिहिले होते की, ‘आता मी ९ वर्षाची आहे. शबरीमाला मंदिराची ही माझी तिसरी यात्रा आहे. आता मी या मंदिरात दर्शनासाठी ४१ वर्षांनी पुन्हा येईल’. या मुलीचे नाव पद्मापूर्णी असे आहे. पद्मापूर्णीने सांगितले की, ती मंदिराची असणारी संस्कृती जपून ठेवण्याचा संदेश लोकांना देऊ इच्छिते. आणि त्यामुळेच आपल्या घरच्यांसोबत ती पोस्टर घेऊन मंदिरात आले. पद्मपूर्णी म्हणाली की, मला या गोष्टीचे वाईट वाटत नाही की, पुढच्या चार दशकांत मला शबरीमाला मंदिरात दर्शन घेता येणार नाही. कारण अयप्पा कायमस्वरुपी माझ्या मनात आहेत.

First Published on: October 22, 2018 4:15 PM
Exit mobile version