निर्भया बलात्कार प्रकरण; पवन अल्पवयीन असल्याचा दावा कोर्टाने फेटाळला

निर्भया बलात्कार प्रकरण; पवन अल्पवयीन असल्याचा दावा कोर्टाने फेटाळला

निर्भया बलात्कार प्रकरण

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याने फाशीची शिक्षा टाळण्यासाठी नवीन युक्ती अवलंबून याचिका दाखल केली होती. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दोषी पवन कुमार गुप्ता हा अल्पवयीन असल्याचा दावा तो करत आहे. याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून या घटनेच्या वेळी तो अल्पवयीन नसल्याचा देखील सांगितलं आहे.

न्या.आर.भानुमति, न्या. अशोक भूषण आणि न्या.ए.एस बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर हायकोर्टाच्या निकालाला दोषी पवनने आव्हान दिलं होत. दोषी पवन गुप्ताने असा याचिकेत म्हटलं होत की, तो गुन्हा घडला त्यावेळेस तो अल्पवयीन होता आणि याकडे दिल्ली उच्च न्यायालयाने दुर्लक्ष केलं होत. त्यामुळे याप्रकरणी सत्यतेची तपासणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी दिली आहे.

यापूर्वी जेव्हा पवन गुप्ताने हायकोर्टात धाव घेतली होती त्यावेळेस देखील याचिका फेटाळून लावली होती. त्याच्या वयाची तपासणी करण्यासाठी हाडांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली नव्हती असा युक्तिवाद त्याने केला होता. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन असल्याचा खटला सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती केली. याशिवाय त्याने १ फेब्रुवारी जारी केलेल्या डेथ वॉरंटवर स्थगितीची मागणी देखील केली होती. अद्याप दोषी पवन आणि अक्षय यांनी कुरेटिव्ह याचिका दाखल केली नसल्याची माहिती आहे. तर दोषी विनय आणि मुकेश यांच्या कुरेटिव्ह याचिका फेटाळण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – मंगळुरु विमानतळावर सापडली स्फोटकाची बॅग


 

First Published on: January 20, 2020 3:37 PM
Exit mobile version