एकाच मुलीवर दोघांचे प्रेम, एकाचा काढला काटा; TikTok वाली खूनी प्रेम कहानी

एकाच मुलीवर दोघांचे प्रेम, एकाचा काढला काटा; TikTok वाली खूनी प्रेम कहानी

एकाच मुलीवर दोघांचे प्रेम, एकाचा काढला काटा; TikTok वाली खूनी प्रेम कहानी

१२ वी शिकत असलेले दोन मित्र एकाच मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे एका मित्राला प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी दुसऱ्या मित्राने धक्कादायक कट रचला. टिकटॉक व्हिडिओ तयार करण्याच्या नावाखाली खूनाचा पूर्ण व्हिडिओ रिकोर्ड केला आणि त्यानंतर त्याचप्रमाणे मित्राचा खून केला. ही खळबळजनक घटना पंजाबच्या जालंधर शहरात घडली आहे.

जालंधर कँट लालकुर्ती बाजारात सोमवारी संध्याकाळी १७ वर्षीय मुलाची हत्या झाली. त्यानंतर २४ तासांच्या आत पोलीस आयुक्तांनी मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणातील मृत मुलाचे नाव अरमान असून त्याच्या आरोपी मित्राला अटक करण्यात आली आहे, जो अल्पवयीन आहे.

याप्रकरणी अशोक कुमार यांनी पोलिसांना सांगितले की, नातू अरमना छावनीतील केव्ही-४ शाळेत बारावीत शिकत होता. त्याचे वडील मुळचे फ्रान्स असून ते एनआरआय होते. तर आई मुलीसोबत हिमाचल प्रदेशला गेली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि आरोप मित्र किशोर याला अटक केली.

पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर म्हणाले की, ‘अरमान आणि त्याचा आरोपी मित्र दोघेही एकत्र शिकत होते. अरमानची मैत्री एका अल्पवयीन मुलीसोबत झाली होती. तिच मैत्रीण आरोपीला आवडत होती. त्यामुळे आरोपी मित्राला अरमान आणि तिची मैत्री पटत नव्हती त्याला अरमानचा खूप राग येत होता. त्यामुळे आरोपीने नियोजित पद्धतीने अरमानचा खून करण्याचा कट रचला.

आरोपीने टिकटॉक व्हिडिओमध्ये खोटं खोटं अरमानचा खून करण्याचे ठरवले होते. तेच त्याने टिकटॉक व्हिडिओ काढल्यानंतर सत्यात उतरवले. आरोपीने टिकटॉक व्हिडिओ काढल्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अरमानला डोक्यावर, चेहऱ्यावर मारले आणि त्याचा गळा दाबून खून केला. अरमानला माहित नव्हते की, टिकटॉक व्हिडिओ करून झाल्यानंतर मित्र त्याचा खून करेल.

जालंधर कॅन्टोन्मेंट पोलिसांनी असोक कुमारच्या तक्रारीवरुन भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टात हजर केले जाईल, असे पोलीस म्हणाले.


हेही वाचा – मॉडेलचा अतिशहाणपणा; डोळ्यात टॅटू काढल्यानंतर झाली आंधळी!


 

First Published on: October 1, 2020 7:36 PM
Exit mobile version