घरट्रेंडिंगमॉडेलचा अतिशहाणपणा; डोळ्यात टॅटू काढल्यानंतर झाली आंधळी!

मॉडेलचा अतिशहाणपणा; डोळ्यात टॅटू काढल्यानंतर झाली आंधळी!

Subscribe

प्रत्येकाला आयुष्यात आपल्या आवडणाऱ्या स्टारप्रमाणे राहायला खूप आवडतं. काही लोकं आपल्या आवडत्या स्टारप्रमाणे फॅशन करतात. किंवा स्टारना आवडणाऱ्या गोष्टींना फॉलो करत असतात. पण आपल्या आवडत्या स्टारप्रमाणे करणं काही वेगळा महागात पडून शकतं. असंच एका तरुणीसोबत घडलं आहे. तिला रॅपर पोपेक (Rapper popek) सारखं दिसण्याची फार इच्छा होती. म्हणून तिने अतिशहाणपणा करत रॅपर पोपेकप्रमाणे डोळ्यांना काळं करायचं ठरवलं. पण दुर्दैवाने हे करणं तिला महागात पडलं. टॅटू करणाऱ्या व्यक्तींच्या चुकीमुळे आयुष्यभर तिला अंधत्व प्राप्त झालं आहे.

ही तरुणी मॉडेल असून तिचं नावं अलेक्झांड्रा सडोव्स्का (Aleksandra Sadowska) असं आहे. तिने केलेल्या आयबॉल टॅटूला स्क्लेरल टॅटू म्हणून देखील ओळखलं जातं. या प्रक्रियेदरम्यान आयबॉलमध्ये शाई इंजेक्ट केली जाते, ज्यामुळे डोळ्यातला पांढरा भाग काळा दिसतो. अलेक्झांड्राच्या डोळ्यात देखील काळी शाई इंजेक्ट केली, ज्यानंतर तिला डोळ्याने दिसणे बंद झाले.

- Advertisement -

पोपेक सारखा लूक मिळवण्यासाठी अलेक्झांड्राने पोलंडच्या पिओटर ए पायोत्र नावाच्या टॅटू आर्टिस्टकडे गेली. त्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये त्रास होऊ लागला. हा त्रास सामान्य असून यावर औषध उपचार केले जाऊ शकतात असं आश्वासन पायोत्र टॅटू आर्टिस्टने दिलं.

चौकशीत टॅटू आर्टिस्टकडून चूक झाल्याचं समोर आलं, ज्यामुळे मॉडेलच्या डोळ्याचे गंभीर नुकसान झाले. टॅटू आर्टिस्टने शरीरावर काढणाऱ्या टॅटूच्या शाईचा वापर केला, जी डोळ्यांच्या संपर्कात आली नाही पाहिजे होती. तसेच या टॅटू आर्टिस्टकडे आवश्यकतेनुसार स्किल आणि ट्रेनिंग नव्हती, असं काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

आता या मॉडेलला एका डोळ्यामध्ये पूर्ण अंधत्व आले आहे आणि कदाचित तिची दृष्टी पूर्ण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच डेली मेलच्या वृत्तानुसार, अलेक्झांड्राला दृष्टी परत मिळवण्यासाठी तीन प्रक्रियेतून जावे लागले. तर डॉक्टरांचा असा दावा आहे की, अलेक्झांड्राच्या डोळ्यात खूप शाई गेली आहे आणि त्यामुळे तिला पुन्हा दृष्टी मिळण्याचा कोणतीही आशा नाही आहे.’


हेही वाचा – एक मासा विकून वृद्ध महिला रातोरात झाली मालामाल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -