पाकिस्तानातील आर्थिक सकंटाला राजकारणी आणि नोकरशाह जबाबदार, संरक्षणमंत्र्याची टीका

पाकिस्तानातील आर्थिक सकंटाला राजकारणी आणि नोकरशाह जबाबदार, संरक्षणमंत्र्याची टीका

इस्लामाबाद : रोखीने त्रस्त असलेल्या पाकिस्तानने आधीच चुका केल्या असल्याचे सांगून पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी, सध्याच्या आर्थिक संकटासाठी आस्थापना, नोकरशाह आणि राजकारण्यांना जबाबदार धरले आहे. स्थिरता आणण्यासाठी पाकिस्तानला स्वत:च्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

सियालकोट येथे ख्वाजा आसिफ हे एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. वृत्तसंस्थेचा हवाला देत ते म्हणाले की, तुम्ही ऐकले असेल की पाकिस्तान दिवाळखोर होत आहे. हे (डिफॉल्ट) आधीच झाले आहे. आम्ही एका दिवाळखोर देशात राहत आहोत. पाकिस्तानच्या समस्यांवर आतंरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) उपाय नाही. आमच्या समस्यांचे उत्तर देशातच आहे.

सध्याच्या आर्थिक दुर्दशेला सत्ताधारी, नोकरशाह आणि राजकारणी सर्व जबाबदार आहेत; कारण पाकिस्तानमध्ये कायदा आणि संविधानाचे पालन होत नाही. त्यांचा बहुतांश वेळ विरोधकांच्या गोटात घालवला गेला आणि गेल्या 32 वर्षांपासून राजकारणाची बदनामी होत असल्याचे त्यांनी पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले. आधीच्या सरकारवर निशाणा साधत आसिफ म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी दहशतवाद्यांना पाकिस्तानात आणण्यात आले होते, परिणामी दहशतवादी कारवाया सुरू आहेत.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानचा वार्षिक चलनवाढीचा दर या आठवड्यात विक्रमी 38.42 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईने ही पातळी गाठली आहे. वास्तविक, पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा सतत घसरत 3 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे. आयातीच्या दृष्टीने हा साठा केवळ फक्त तीन आठवडे पुरेल एवढाच आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या मदतीवर आहे, पण त्यातही विलंब होत आहे.

First Published on: February 19, 2023 6:46 PM
Exit mobile version