Omicron variant : मिश्र डोस दिल्याने वाढतेय रोगप्रतिकारशक्ती ; ऑक्सफर्डचे नवे संशोधन

Omicron variant : मिश्र डोस दिल्याने वाढतेय रोगप्रतिकारशक्ती ; ऑक्सफर्डचे नवे संशोधन

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. त्यातच आता कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने जगभर थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. मात्र कोरोनाच्या लसींचे दोन डोस म्हणजेच मिश्र डोस देण्याबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा झाली होती.मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका संशोधकाने एक नवे संशोधन जगासमोर आणले आहे. या संशोधकाने मिश्र डोस दिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते,याबाबतीत नवे संशोधन केले आहे.

या संशोधनाचा अहवाल लँसेट मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनासाठी संशोधकाने चाचणी केली असून,या चाचणीत १०७० जण सहभागी झाले होते. त्यांनी चाचणीत सहभागी असणाऱ्यांना ॲस्ट्राझेनेका किंवा फायझरच्या लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर माॅडर्ना किंवा नाेवावॅक्सच्या लसीचा दुसरा डाेस दिला.या मिश्र डाेस दिल्यानंतर या नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत. त्यांच्यामध्ये काेराेना विषाणूविराेधात बळकट राेगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचे आढळून आले आहे, असे संशोधनातून स्पष्ट झाल्याचे प्रा. मॅथ्यू स्नेप यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये ओमायक्राॅनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू

दक्षिण आफ्रिकेतून पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे जगाची चिंता वाढली आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनने पाय पसरले आहेत. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनबाधित ९० रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ३३६वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी संसदेत दिली.

५ ते १४ वयोगटातील मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका – WHO

दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झालेय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना संसर्गााबाबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, ५ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वेगाने वाढतेय. त्यामुळे लहान मुलांना ओमिक्रॉन सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जातेय.

 


हे ही वाचा – आम्ही काही भारत नाही, श्रीलंकन मॅनेजरला जिवंत जाळल्याच्या प्रकारावर पाकिस्तानी मंत्र्याचे वादग्रस्त विधान


 

First Published on: December 8, 2021 12:20 PM
Exit mobile version