मोदींच्या दौऱ्यासाठी १००० झाडांची कत्तल!

मोदींच्या दौऱ्यासाठी १००० झाडांची कत्तल!

मोदींच्या दौऱ्यासाठी १००० झाडांची कत्तल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीपासून ओडिशा दौऱ्यावर जाणार आहेत. ते ओडीशाच्या बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मात्र, मोदींच्या या दौऱ्यासाठी चक्क १ हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. हेलिपॅड निर्मिती आणि सुरक्षेसाठी या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने यासंबंधी माहिती दिली आहे. या झाडांची कत्तल करण्यासाठी वन विभागाची कुठलिही परवानगी घेण्यात आलेली नाही, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. त्यामुळे सध्या मोदींचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च १४८४ कोटी रूपये!!

रेल्वेने हात झटकले

वृक्षतोड करण्यात आलेली जागा ही रेल्वेच्या मालकिची आहे. २०१६ साली वृक्षरोपणाच्या मोहिमेद्वारे रेल्वेच्या अधिकृत जागेतील २.२५ हेक्टर जागेवर ही झाडे लावण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी तयार करण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सव्वा हेक्टर जागा रिकामी करण्यात आली आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांची उंची ही चार ते सात फूट उंचीची होती. वनविभागाने रेल्वे प्रशासनाकडे ही झाडे का पाडण्यात आली, यासंदर्भात लेखी माहिती मागवली आहे. दरम्यान, एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी आपले हात झटकले आहेत. याप्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचे हेलिपॅड बनवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेने दिले आहे.

हेही वाचा – मोदी ठरले सर्वात महागडे पंतप्रधान

‘वनअधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली’

दरम्यान, केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वनअधिकाऱ्याला चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, जे लोक मोदींच्या ओडीशा भेटीला घाबरत आहेत त्यांनी वनअधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली आहे.

हेही वाचा – सोलापूर दौरा; मोदींनी फुंकले लोकसभेचं रणशिंग

First Published on: January 14, 2019 7:44 PM
Exit mobile version