अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वरील परेडमध्ये दिसणार फक्त महिला सैनिक?

अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वरील परेडमध्ये दिसणार फक्त महिला सैनिक?

26 जानेवारी 2024 ला देशभरात 75वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारत अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असताना आता दिल्लीच्या कर्तव्य पथावर महिलांचे सैन्य, महिलांचे बँड पथक, महिला अधिकारी वर्ग यांचाच समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. तर प्रशासकीय पातळीवर देखील सुद्धा या संदर्भात चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

हेही वाचा – आलिशान कार, पर्यटन सहलींसह क्रिप्टो कॉइन असे सांगून तब्बल साडेचार कोटींना गंडवले

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीमध्ये या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात आला असून 2024च्या प्रजासत्ताक दिनाला केवळ महिला सैनिकांच्या पथकांचेच केवळ संचलन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संचलनाबरोबरच वाद्यवृंद तसेच विविध मंत्रालये आणि राज्यांचे चित्ररथ तसेच अन्य सादरीकरणांमध्ये केवळ महिलांचाच सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात सरकारने सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली असून यासाठी ही पाऊले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी 74 व्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये भारताने आपले लष्करी सामथ्र्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले होते. स्त्री शक्तीचे या कर्तव्य पथावर दर्शन घडवून देणे ही या वेळची मुख्य कल्पना होती. त्यामुळे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांनी आपल्या चित्ररथांमधून ‘नारी शक्ती’चे सादरीकरण केले होते.

हेही वाचा – अतिकची पत्नी शाइस्ता परवीनने काढलीय स्वत:ची गँग

तसेच संचलनात भारतीय वायू सेनेच्या 144 हवाई योद्ध्यांच्या तुकडीचे नेतृत्व तीन पुरुष अधिकाऱ्यांसह एका महिला अधिकाऱ्याने केले होते. ज्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. त्यामुळे आता देशाच्या 75 व्या प्रजासत्ताकदिनी याच्या पुढे एक पाऊल जात कर्तव्यपथावर केवळ महिलाराज दिसण्याची शक्यता आहे.

First Published on: May 8, 2023 4:01 PM
Exit mobile version