Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश अतिकची पत्नी शाइस्ता परवीनने काढलीय स्वत:ची गँग

अतिकची पत्नी शाइस्ता परवीनने काढलीय स्वत:ची गँग

Subscribe

माफिया अतिक अहमद याची पत्नी शाइस्ता परवीन हिला पोलिसांनी माफिया म्हणून घोषित केसे आहे. प्रयागराज पोलिसांच्या एफआयआर मध्ये शाइस्ताला माफिया म्हटले आहे. पोलिसांकडून आता शाइस्ता हिचा शोध घेतला जात आहे. उमेश पाल हत्या प्रकरणात शाइस्ता ही आरोपी आहे. युपी पोलिसांकडून शाइस्ताच्या अटकेसाठी सातत्याने छापेमारी केली जात आहे. परंतु तिला अद्याप पकडण्यात आलेले नाही.

उमेश पाल हत्या प्रकरणात आरोपी अतिक आणि त्याचा लहान भाऊ अशकफ याला १५ एप्रिलला प्रयागराजच्या एका शासकीय रुग्णालयाच्या गेटवर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडत हत्या केली होती. अतिक-अशरफ यांची हत्या अशावेळी झाली जेव्हा पोलीस त्या दोघांना वैद्यकिय चाचणीसाठी घेऊन जात होते. याआधी पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद आणि गुलाम याला १३ एप्रिलला झांसी एनकाउंटरमध्ये ठार करण्यात आले होते.

- Advertisement -

प्रयागराज पोलिसांनी आता एका व्यक्तीच्या विरोधात केस दाखल केली आहे. पोलिसांनी माफिया अतिक याची पत्नी शाइस्ता परवीन आणि अन्य एक आरोपी साबिरला आश्रय दिल्याच्या आरोपात एक स्थानिक व्यक्ती अतिन जाफरच्या विरोधात केस दाखल केलीय. दोघे उमेश पाल आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या हत्येत वंछित आहेत. उमेश पाल याची २४ फेब्रुवारीला धुमनगंज परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजू पाल हत्याकांडात उमेश पाल हा मुख्य साक्षीदार होता.

पोलिसांनी मोहम्मद अतिन जाफरला नुकत्याच एका छापेमारी दरम्यान ताब्यात घेतले होते. पण चौकशीनंतर त्याला मात्र सोडून दिले. पोलिसांनी असे म्हटले होते की, जाफरने १५ एप्रिल पर्यंत अतिकच्या हत्येच्या एक दिवसानंतर शाइस्ता आणि साबिरला खुल्दाबाद परिसरात आप्या निवसास्थानी कथित रुपात आश्रय दिला होता. उमेश पाल हत्याकांडात साबिर वर पाच लाखांचे बक्षीस ही लावण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी असे म्हटले की, चौकशीदरम्यान जाफरने स्विकार केले की, शाइस्ता आणि साबिर १६ एप्रिलला प्रयागराजच्या खुल्दाबाद परिसरातील त्याच्या निवसस्थानी थांबला बोता. पुढील दिवशी एका अज्ञात ठिकाणी निघून गेलाय पोलिसांच्या मते, जाफरने त्यांना असे सुद्धा सांगितले की, शाइस्ता आणि साबिरने अतिकच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचा प्लॅन तयार केला होता. मात्र अखेरच्या वेळी त्यांनी यामध्ये बदल केला. कारण अंत्यसंस्कारावेळी खुप पोलिसांचा फौजफाटा तेथे तैनात होता.

उमेश पालच्या हत्येतील तीन शूटर 73 दिवस झाले तरीही अद्याप फरार आहेत. अशातच युपी पोलिसांकडून गुड्डू मुस्लिम याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांचे असे मानणे आहे की, गु्ड्डू मुस्लिमकडे अतिकची काही गुप्त माहिती आहे. आतापर्यंत चार वेळा गुड्डू हा एसटीएफच्या हातातून निसटला गेलाय. उमेश पाल हत्याकांडानंतर ११ एप्रिल पर्यंत अतिक आणि अशरफ यांच्या संपर्कात गुड्डू होता.

गुड्डूला ट्रॅक करणाऱ्या एसटीएफच्या टीमने एका खासगी न्यूज चॅनलला सांगितले की, ओडिशानंतर गुड्डू बद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. याआधी एसटीएफला इनपुट मिळाले होते की, गुड्डू 5 मार्चला मेरठ येथून बस पकडून दिल्लीतील ISBT बस स्टँडवर आला होता. दिल्लीत आल्यानंतर तो तेथून गायब झालाय त्यानंतर 21 मार्चला बिहार मधील भागलपुर मध्ये गु्ड्डू मुस्लिम याचे लोकेशन मिळाले. एसटीएफची टीम येथे पोहचली पण तत्पूर्वी त्याने तेथून पळ काढला होता.

भागलपुर नंतर गुड्डू हा मुस्लिम रायगंज येथे पोहचला. काही दिवसानंतर तो तेथून सुद्धा फरार झाला. 2 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत गुड्डू मुस्लिम हा उडीसात होता. जेव्हा एसटीएफची टीम तेथे सुद्धा दाखल झाली तेव्हा तेथून ही पळाला होता. गुड्डूला आश्रय देणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता, तो आजारी असल्याचे दिसून येत होते असे सांगितले.


हेही वाचा- Amritsar Blast : पंजाबमध्ये 30 तासांत दुसरा भीषण स्फोट, पोलिसांकडून तपास

 

 

- Advertisment -