नीरव मोदीला पीएनबी घोटाळा प्रकरणी ७ हजार कोटी परत देण्याचे आदेश

नीरव मोदीला पीएनबी घोटाळा प्रकरणी ७ हजार कोटी परत देण्याचे आदेश

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर फरार झालेला नीरव मोदी याला पुण्याच्या डीआरटी अर्थात कर्ज वसुली न्यायाधीकरनाने मोठा दणका दिला आहे. व्याजासहित ७ हजार ३०० कोटी रुपये नीरव मोदीने पीएनबीला परत करावे असा आदेश डीआरटीने दिला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पीएनबीला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरनचे अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहे. मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११ हजार ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल असल्याने बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे.

First Published on: July 6, 2019 1:25 PM
Exit mobile version