Video : दोन इमारतीच्या छतालाच बनवले ‘टेनीस कोर्ट’

Video : दोन इमारतीच्या छतालाच बनवले ‘टेनीस कोर्ट’

Video : दोन इमारतीच्या छतालाच बनवले 'टेनीस कोर्ट'

जगभरात अनेक देशांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जणांना घरात बसून काय करावे? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या युक्त्या शोधून आपला वेळ घालवत आहेत. तर काही जण घरात खमंग अशा रेसिपी बनवत आहेत. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये चक्क दोन तरुणींनी इमारतीच्या छतालाच ‘टेनीस कोर्ट’ बनवत सराव करताना दिसत आहेत.

पहा कशा खेळत आहेत या मुली

कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरता सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या दोन तरुणी चक्क इमारतीच्या छतावरुन टेनीस खेळत आहे. हा २४ सेकेंचा व्हिडिओ इटलीमधला असून त्या ठिकाणच्या एका स्थानिक टेनिस क्लबने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी उत्तमरित्या टेनिस खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी याकरता टेनिस ग्राऊंडचा नाहीतर आपल्या इमारतीच्या छताचा वापर केला आहे. यामध्ये या तरुणींनी १२ शॉटस् खेळले आहेत.

यामधील एकीने सांगितले आहे की, ‘त्यांच्या शिक्षकांनी त्यांना घरी सराव करण्यासाठी सांगितले आहे. त्यासोबतच तुम्ही सराव करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास देखील सांगितले आहे. त्यामुळे आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ही युक्ती शोधली आहे. मात्र, बऱ्याचदा दोन इमारतीमधील अंतर ठेऊन खेळताना बॉल खाली देखील पडतो. परंतु, तरी देखील आम्ही या लॉकडाऊनमध्ये सराव करत आहोत’.


हेही वाचा – कोरोनाच्या संकटात ‘या’ आजारामुळे कुत्र्यांचा सातत्याने मृत्यू!


First Published on: April 21, 2020 5:15 PM
Exit mobile version