सलग १९ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ!

सलग १९ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ!

देशात सलग १९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत ८० रुपये पार झाली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा डिझेलची किंमत ८० रुपये पार झाली आहे. दिल्लीमध्ये डिझेलची किंमतीत १४ पैशांची वाढ झाल्याने आता नवी किंमत ८०.०२ रुपये प्रति लीटर झाली आहे. तर पेट्रोलची किंमतीत १६ पैशांनी वाढ झाली आहे. या १९ दिवसांत पेट्रोल ८.६६ रुपयांनी तर डिझेल १०.६२ रुपयांनी महाग झाले आहे.

शहर        पेट्रोल किंमत             डिझेल किंमत
दिल्ली        ७९.९२                          ८०.०२
मुंबई          ८६.७०                          ७८.३४
कोलकाता    ८१.६१                         ७५.१८
चेन्नई          ८३.१८                          ७७.२९
बेंगळुरू        ८२.५२                        ७६.०९
लखनऊ      ८०.५९                        ७२.०४
पटना         ८२.९१                         ७७.००
चंडीगढ      ७६.९२                        ७१.५२

एक दिवसांपूर्वी देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेलच्या किंमतीने पेट्रोलच्या किंमतीला मागे टाकली होती. २४ जूनला पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. परंतु डिझेलच्या किंमतीत ४८ पैशांची वाढ झाली होती. तथापि, फक्त दिल्लीत ही परिस्थिती आहे. देशातील उर्वरित भागांमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीतील वाढलेल्या किंमतीचे कारण व्हॅट आहे. लॉकडाऊन दरम्यान दिल्लीच्या सरकारने डिझेलवर व्हॅटची किंमत वाढवली होती. तर दुसरे कारण म्हणजे भारत सरकारने मेच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेवरील उत्पादन शुल्क वाढविले.

पेट्रोलवर प्रति लीटर उत्पादन शुल्कात १० रुपयांची वाढ करण्यात आली. तर डिझेलवरीव प्रति लीटर उत्पादन शुल्कात १३ रुपयांची वाढ करण्यात आली.

पण तरीही, देशभरात पेट्रोलपेक्षा डिझेल का महाग नाही, अशा प्रश्न उपस्थितीत होतो. यामागील कारण म्हणजे गेल्या महिन्यात दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढविले. पेट्रोलची किंमत प्रति लिटर १.६७ रुपये तर डिझेलची किंमत ७.१० रुपये प्रति लीटर होती. यामुळे दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.


हेही वाचा – अबब! सोन्याची किंमत रचणार इतिहास, दिवाळीत गाठणार उच्चांक!


 

First Published on: June 25, 2020 9:30 AM
Exit mobile version