Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR

Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR

कोरोनाविरोधातील ब्लड प्लाझ्मा थेरपीला जागतिक आरोग्य संघटनेचा विरोध

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतेही प्रभावी औषध बाजारात आले नाही, परंतु प्लाझ्मा थेरपी त्याच्या उपचारामध्ये खूप प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली सरकारने सर्वप्रथम प्लाझ्मा बँक तयार केली आणि अनेक दावेही केले. नंतर बर्‍याच राज्यांनी ही थेरपी प्रभावी असल्याचे समजून त्या-त्या राज्यात प्लाझ्मा थेरपीची सुरूवात केली.

मात्र आयसीएमआरने (ICMR) केलेल्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की कोरोना रूग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यानंतर कोणताही वेगळा प्रभाव दिसत नाही. तर प्लाझ्मा थेरपी देखील त्यांचे प्राण वाचविण्यात मदत करत नाही. कोरोना रूग्णांच्या बचावात मोठी आशा तसेच विश्वास असणाऱ्यांना या संशोधनाचा मोठा धक्का बसला आहे. या नवीन संशोधनामुळे प्लाझ्मा थेरपी करणाऱ्यांची संख्या देखील कमी होऊ शकते.

संशोधन टीमच्या सदस्याने सांगितले की, आतापर्यंत प्लाझ्माचा वापर संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. परंतु त्याची अचूकता कधीही निर्विवाद राहिलेली नाही. कोरोनाच्या बाबतीतही, ही अचूक उपचार पद्धत असल्याचे सिद्ध झालेले नाही. संशोधनादरम्यान, या टीमला असे आढळले आहे की कोरोना रूग्णांमध्येही ज्याला प्लाझ्मा देण्यात आला होता, त्यांच्यातही मृत्यूचे प्रमाण प्लाझ्मा न देणाऱ्या रूग्णांएवढाच होता.

तज्ज्ञांनी असाही दिला सल्ला

प्लाझ्माबद्दलचे सर्वात जास्त मत असे होते की रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर कोरोना रूग्णाची गंभीर अवस्था सुधारते. पण हे संशोधनही चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझ्मा दिल्यानंतर रूग्णांच्या स्थितीत जो परिणाम झाला तोच इतर रुग्णांमध्ये झाल्याचे नोंदवले गेले आहे. संशोधनाचा परिणाम पाहता तज्ज्ञांनी कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.


Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख पार!

First Published on: September 10, 2020 5:21 PM
Exit mobile version