समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती वाढते, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती वाढते, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’च्या माध्यमातून संपूर्ण देशाला संबोधित करत आहे. मन की बातचा आज 98वा भाग आहे. लोकसहभागाच्या अभिव्यक्तीसाठी तुम्ही सर्वांनी मन की बात हे एक अप्रतिम व्यासपीठ बनवले आहे. यावेळी मोदींनी मन की बात या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती वाढते, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आम्ही मन की बातच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये पाहिले आहे की, समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती म्हणजेच ताकद कशी वाढते. मला तो दिवस आठवतोय, जेव्हा आपण मन की बातमध्ये भारताच्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबद्दल बोललो होतो. त्यावेळी देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, आनंद घेण्याची आणि शिकण्याची लाट उसळली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताच्या डिजिटल क्रांतीची ताकद म्हणजे ई-संजीवनी अॅप

सामान्य माणूस, मध्यमवर्ग आणि देशातील डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी ई-संजीवनी अॅप बनत आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीची ही ताकद आहे. आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलिकन्सल्टंटची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

यूपीआयकडे अनेक देशांचं लक्ष

भारताच्या यूपीआयची शक्ती किती आहे हे तुम्ही जानता. जगभरातील अनेक देश याकडे आकर्षिले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच भारत आणि सिंगापूरमध्ये UPI-Pay Now Link launch करण्यात आलं. त्यामुळे दोन्ही देशातील लोकं एकदम सहजरित्या पैसै ट्रान्सफर करू शकतात. हे तंत्रज्ञान जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण मन की बातमध्ये 3 स्पर्धांबाबत बोललो होतो. या स्पर्धा देशभक्तीवरील गाणी आणि रांगोळी यांच्यावर आधारित होती. यामध्ये देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील आणि 5 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता, असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणीबद्दल आणि उस्ताद बिस्मिल्ला यांच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार बद्दल मोठं वक्तव्य करत संगीत आणि कलेच्या लोकप्रियतेबाबत त्यांनी भाष्य केलं.


हेही वाचा : ५२ वर्षांपासून माझ्याकडे घर नाही, १९७७ सालच्या घटनेमुळे राहुल गांधी


 

First Published on: February 26, 2023 1:13 PM
Exit mobile version