Russia Ukraine War: २४ तासांत पंतप्रधान मोदींची तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा

Russia Ukraine War: २४ तासांत पंतप्रधान मोदींची तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा

Russia Ukraine War: २४ तासांत पंतप्रधान मोदींची तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. युक्रेनमधील असलेल्या परिस्थितीवर सतत चर्चा होत आहे. यादरम्यान सरकार युद्ध पातळीवर मोहीम सुरू करून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना स्वदेश आणले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. गेल्या २४ तासांत पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक करत आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश प्रचारानंतर लगेच रविवारी रात्री महत्त्वाची बैठक केली होती. या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा एका उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या सीमावर्ती देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

२० हजारांहून अधिक नागरिक अडकले युक्रेनमध्ये

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आणि इतर लोकांना मिळून जवळपास २० हजारांहून अधिक भारतीय युक्रेनमध्ये राहतात. सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अजूनही जवळपास १८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासांकडून सतत या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत.


हेही वाचा – Russia-Ukraine War: आपला जीव वाचवा अन् मागे जा; रशियन सैनिकांना युक्रेनच्या राष्ट्रपतींचा इशारा


 

First Published on: February 28, 2022 9:44 PM
Exit mobile version