घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: आपला जीव वाचवा अन् मागे जा; रशियन सैनिकांना युक्रेनच्या राष्ट्रपतींचा...

Russia-Ukraine War: आपला जीव वाचवा अन् मागे जा; रशियन सैनिकांना युक्रेनच्या राष्ट्रपतींचा इशारा

Subscribe

युक्रेन-रशिया युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. हे युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बेलारुसमध्ये चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियन सैन्याला मागे जाण्याचा इशारा दिला आहे. झेलेंस्की म्हणाले की, ‘आम्ही सर्वजण योद्धा आहोत आणि लढाई जिंकू. रशियन सैनिकांनी आपला जीव वाचवा आणि परत जा.’ तसेच या बेलारुसमध्ये होणाऱ्या चर्चेबाबत म्हणाले की, ‘ही चर्चा यशस्वी होण्याची आशा नाही. पण शांततेसाठी प्रयत्न करण्यात कोणतेही नुकसान नाही.’

बेलारुसमधील चर्चेच्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की म्हणाले की, ‘जेव्हा मी राष्ट्रपती झालो, तेव्हा मी म्हणालो होतो की, प्रत्येक व्यक्ती राष्ट्रपती आहे. कारण आपण सर्व सुंदर युक्रेन देशासाठी जबाबदार आहोत. आपल्यातील प्रत्येक जण योद्धा आहे. त्यामुळे आपल्यातील प्रत्येक जण जिंकेल असा विश्वास मला आहे.’

- Advertisement -

पुढे झेलेंस्की म्हणाले की, ‘रशियाने तात्काळ आपले सैन्य माघार घ्यावे आणि सीजफायर घोषित करावे.’

युक्रेनमध्ये आतापर्यंतची परिस्थिती

युक्रेनने म्हटले की, ‘आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात ३५२ लोकांचा जीव गेला आहे. ज्यामध्ये १४ लहान मुलांचा समावेश आहे. याशिवाय १ हजार ६८४ लोकं गंभीर जखमी झाले आहेत.’ यूएनच्या माहितीनुसार, युक्रेनसोडून दुसऱ्या देशांमध्ये शरण आलेल्यांची संख्या ३ लाख ८६ हजार झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Russia Ukraine War: युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार; ३६ देशांसाठी हवाई हद्द केली बंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -