G7 Summit : जर्मनीत जूनमध्ये होणाऱ्या जी-७ बैठकीत पीएम नरेंद्र मोदींचा सहभाग

G7 Summit : जर्मनीत जूनमध्ये होणाऱ्या जी-७ बैठकीत पीएम नरेंद्र मोदींचा सहभाग

सात शक्तीशाली देशांच्या जी-७ (G-7) गटाची बैठक पुढील महिन्यात जर्मनीतील (Germany)  बेव्हेरिया येथे होणार आहे. त्यासाठी जोरदार पद्धतीने तयारी सुरू आहे. कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन यांसारख्या देशांनी गेल्या काही वर्षांपासून या संघटनेच्या बैठकीत आमंत्रित केलेल्या इतर देशांचाही समावेश आहे. याबाबत भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर (Walter J. Lindner) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनाही या वर्षीच्या जी-७ च्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या वतीने हे निमंत्रण (Invite) स्वीकारण्यात आले आहे.

चार आठवड्यांत जर्मनीतील बेव्हेरिया येथे जी-७ देशांची बैठक होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशियातील विकसित आणि बलाढ्य देशांनाही जी-७ देशांच्या या बैठकीत आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. यावेळी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जी-७ बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे, असं भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी सांगितले आहे.

मैत्री आणि सहकार्य आवश्यक – जर्मनी

जर्मन राजदूताने असेही सांगितले आहे की, आम्हाला आमच्या अमेरिकन, जपानी आणि ऑस्ट्रेलियन मित्रांकडून समजले आहे की, ते याकडे सकारात्मकतेने पाहत आहेत. भारत हा क्वाडचा एक भाग आहे. कारण ते आपल्यातील मैत्री आणि सहकार्याची परस्पर संमती दर्शवते. रशियावर निशाणा साधत त्यांनी युद्ध आणि आक्रमकतेची जागा दाखवायला हवी असेही म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी २४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधील टोकियो येथे क्वाड देशांच्या गटाच्या बैठकीत सहभागी झाले होते. या गटात भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट झाली. तेव्हा त्यांनी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : मागील २४ तासांत राज्यात ५३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत घट


 

First Published on: May 27, 2022 10:42 PM
Exit mobile version